AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंग गॅलेक्सी F17e 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध, किंमत फक्त इतकी…

सॅमसंग गॅलेक्सी F17e 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध असून, बँक आणि एक्सचेंज ऑफर्सनंतर त्याची प्रभावी किंमत इतकी कमी होत आहे.चला तर मग हा फोन तुम्हाला कोणत्या किंमतीत खरेदी करता येईल ते जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी F17e 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध, किंमत फक्त इतकी…
F17 5G tv9Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: May 07, 2026 | 11:28 AM
Share

तुम्ही जर 15 हजारापेक्षा कमी किमतीचा नवीन 5G स्मार्टफोन शोधत असाल तर Samsung Galaxy F17e 5G हा एक उत्तम फोन पर्याय आहे.जो सुरळीत कामगिरी देतो. या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 6,000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. हा स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवर अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या डिव्हाइसवर बँक आणि एक्सचेंज ऑफर्सही उपलब्ध आहेत, ज्यामुळे त्याची प्रभावी किंमत आणखी कमी होते. चला या जबरदस्त डीलवर अधिक जाणून घेऊयात.

Samsung Galaxy F17e 5G वर सवलतीची ऑफर

या आकर्षक सॅमसंग फोनची फ्लिपकार्टवर मूळ किंमत 16 हजार 999 रूपये आहे, परंतु हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सध्या हा फोन फक्त 14 हजार 499 रूपयामध्ये खरेदी करता येणार आहे. इतकेच नाही तर या डिव्हाइसवर आकर्षक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. विशेषतः फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक किंवा फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून तुम्हाला 725 रूपयांची सूट मिळू शकते, ज्यामुळे फोनची अंतिम किंमत 13 हजार 774 होईल.

हा फोन 10 हजारापर्यंतच्या एक्सचेंज डिस्काउंटसह देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते. शिवाय 510 रूपयांपासून सुरू होणारे EMI पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही हे डिव्हाइस अत्यंत परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता.

सॅमसंग गॅलेक्सी F17e 5G ची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास या सॅमसंग फोनमध्ये 6.74-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटलाही सपोर्ट आहे. हा फोन मीडियाटेकच्या डायमेन्सिटी 6300 ऑक्टा-कोअर प्रोसेसरवर चालतो. या डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे.

सेल्फीसाठी फोममध्ये बसवलेला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये मोठी 6000mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की ही मोठी बॅटरी 26 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देऊ शकते. हे डिव्हाइस 4GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येते.

Follow Us
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ
मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ओमराजेंची
Omraje Nimbalkar | तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ओमराजेंची मोठी भूमिका; थेट दंड थोपटले!
ठाकरेंवर कधी बोललो नाही, बोलणारही नाही; आष्टीकरांनी स्पष्टच सांगितलं
Nagesh Ashtikar On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर कधी बोललो नाही, बोलणारही नाही; आष्टीकरांनी स्पष्टच सांगितलं
खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपय
Omraje Nimbalkar | खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपयाही...
ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता
ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता दिल्लीतील...नेमका निर्णय काय?