AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्वाड कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह सॅमसंगचा बजेट फ्रेंडली 5G फोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

ई-कॉमर्स कंपनी Amazon ने Samsung Galaxy M33 5G फोनचा टीझर रिलीज केला आहे. म्हणजेच भारतात लॉन्च झाल्यानंतर हा फोन Amazon India च्या साइटवरून खरेदी करता येईल.

क्वाड कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह सॅमसंगचा बजेट फ्रेंडली 5G फोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Samsung Galaxy M33 5G Image Credit source: Samsung
| Updated on: Apr 02, 2022 | 3:46 PM
Share

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंग (Samsung) त्यांच्या M सिरीज अंतर्गत भारतात नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एम33 5जी (Samsung Galaxy M33 5G) लॉन्च करणार आहे. हा फोन भारतात आज (2 एप्रिल) दुपारी लॉन्च होईल. सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एम (Galaxy M) सिरीज फोनच्या लॉन्चची तारीख अधिकृतपणे अगोदरच जाहीर केली आहे. दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगच्या आगामी फोनमध्ये 6000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी आणि 25 W चार्जिंग सपोर्ट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या फोनमध्ये 5nm ऑक्टा-कोर प्रोसेसर देखील असू शकतो. Samsung Galaxy M33 5G मध्ये 120 Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाचा मोठा LCD डिस्प्ले देखील असण्याची शक्यता आहे. फोनच्या रियर पॅनलवर क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ  शकतो.

ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने Samsung Galaxy M33 5G फोनचा टीझर रिलीज केला आहे. म्हणजेच भारतात लॉन्च झाल्यानंतर हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनच्या साइटवरून खरेदी करता येईल. अमेझॉनवर शेअर करण्यात आलेल्या फोनच्या टीझरमध्ये 14 सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात फोनची इमेजही पाहता येते आणि फोनच्या डिझाईनचाही अंदाज लावता येतो.

Samsung Galaxy M33 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

काही रिपोर्टनुसार, Samsung Galaxy M33 5G फोन भारतात दोन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. त्यापैकी एक 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेलं व्हेरीएंट आणि दुसरा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज ऑप्शन आहे. मार्च महिन्याच्या  सुरुवातीला, एका टिपस्टरने Samsung Galaxy M33 5G फोनबद्दल काही माहिती शेअर केली होती. त्यामध्ये सांगितले होते की, Samsung Galaxy M33 5G फोन Android 12 आधारित One UI 4.1 सह सुसज्ज असू शकतो. या फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाचा फुल HD+ असा मोठा डिस्प्ले देखील असण्याची शक्यता आहे.

या फोनच्या कॅमेरा फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर फोनच्या बॅक पॅनलवर क्वाड रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. यात 50 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह 5 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि दोन 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि डेप्थ कॅमेरा सेन्सर असू शकतात. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता आहे. याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी एम33 5G फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.