Samsung Galaxy S25 Edge वाढवणार iPhone 16 Proच टेंन्शन, फिचर्स अन् किंमत झाली लीक
भारतीय बाजारात लवकरच एक नवीन सॅमसंग स्मार्टफोन फ्लॅगशिप फीचर्ससह लाँच होणार आहे. सध्या, Samsung Galaxy S25 Edge कोणत्या दिवशी लाँच होईल याची माहिती समोर आलेली नाही, परंतु या फोनच्या फीचर्स आणि किंमतीशी संबंधित तपशील लीक झाले आहेत. लीक्सच्या आधारे, या फोनमध्ये कोणते खास फीचर्स मिळू शकतात? हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात...

सॅमसंग कंपनीचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Edge मे महिन्यात ग्राहकांसाठी लाँच केला जाऊ शकतो. अधिकृत लाँच होण्यापूर्वी, या आगामी फोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीशी संबंधित माहिती लीक झाली आहे, जर्मन प्रकाशन WinFuture ने या सॅमसंग स्मार्टफोनचे फीचर्स लीक केले आहेत. महत्त्वाच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, टायटॅनियम फ्रेमसह येणाऱ्या या फोनच्या पुढील आणि मागील बाजूस काचेचे डिझाइन वापरले जाऊ शकते. लाँचिंगपूर्वी, या फोनमध्ये कोणते खास फीचर्स मिळू शकतात आणि या हँडसेटची किंमत किती असेल ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
Samsung Galaxy S25 Edge स्पेसिफिकेशन्स (लीक)
डिस्प्ले: लीकमधून मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy S25 Edge मध्ये 6.7-इंचाची AMOLED स्क्रीन असू शकते. 120हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येणाऱ्या या फोनमध्ये स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सिरेमिक 2 आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 वापरले जाऊ शकतात.
खास फिचर्स: धूळ आणि पाण्याचे प्रतिरोधकता यासारख्या फिचर्ससह, या फोनमध्ये सुरक्षिततेसाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर देखील असण्याची अपेक्षा आहे.
प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, गॅलेक्सी एस25 एजमध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर असू शकतो.
कॅमेरा सेटअप: या फोनच्या मागील बाजूस 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स असेल. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर उपलब्ध असू शकतो.
कनेक्टिव्हिटी: वाय-फाय 7 सह येणाऱ्या या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.4 सपोर्ट सारख्या इतर अनेक खास फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.
बॅटरी क्षमता: या फोनला जीवंत करण्यासाठी 3900mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली जाऊ शकते, परंतु सध्या हा फोन किती वॅट्सच्या जलद चार्जिंग क्षमतेसह लाँच केला जाईल याबद्दल कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.
Samsung Galaxy S25 Edgeची किंमत (लीक)
जर्मनीमध्ये सॅमसंगच्या या आगामी फ्लॅगशिप फोनच्या 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1249 युरो म्हणजेच भारतीय चलनानूसार 1 लाख 19 हजार रुपये आणि 512 जीबीच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 1369 युरो म्हणजेच भारतीय चलनानूसार 1 लाख 30 हजार रुपये इतके असू शकते. या किंमतीच्या श्रेणीत, हा फोन iPhone 16 Proला जोरदार टक्कर देऊ शकतो.
