अ‍ॅपलला ट्रोल करणारी सॅमसंग कंपनीसुद्धा ‘या’ स्मार्टफोनसोबत चार्जर आणि इअरफोन्स देणार नाही

सॅमसंगने नुकतेच Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स लाँच केले आहेत.

अ‍ॅपलला ट्रोल करणारी सॅमसंग कंपनीसुद्धा 'या' स्मार्टफोनसोबत चार्जर आणि इअरफोन्स देणार नाही
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 3:28 PM

मुंबई : सॅमसंगने नुकतेच Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये मच-अवेटेड Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. हे स्मार्टफोन्स रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आले आहेत. दरम्यान सॅमसंगने त्यांच्या नवीन फोनच्या बॉक्समधून चार्जर आणि ईयफोन्स गायब केले आहेत. (Samsung Trolls itself by not giving Charger and Earphones with Galaxy S21 box)

यापूर्वी अॅपल कंपनीने त्यांची आयफोन सिरीज 12 लाँच केली होती. त्यावेळी कंपनीने घोषणा केली होती की, कंपनी आयफोन 12 सोबत चार्जिंग अडॅप्टर आणि मोफ्त इयरफोन्स देणार नाही. तेव्हा सॅमसंगने अॅपल कंपनीला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. परंतु आता सॅमसंगने अॅपलच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या नव्या गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील स्मार्टफोन्सच्या बॉक्समधून चार्जर आणि इयरफोन्स हटवले आहेत.

या स्मार्टफोन्सच्या बॉक्समध्ये केवळ स्टार्ट गाईड, युएसबी सी केबल आणि एक सिम इजेक्टर टुल मिळणार आहे. यापूर्वी सॅमसंग किमान AKG ईयरफोन्स तरी बॉक्ससोबत देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, परंतु ते इयरफोन्सदेखील मिळणार नाहीत. त्यामुळे सॅमसंगच्या गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील महागडे फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकाला चार्जर आणि इयरफोन्ससाठी वेगळे पैसे खर्च करावे लागणार आहेत.

मायक्रो एसडी स्लॉटही गायब

सॅमसंगच्या या सिरीजमुळे युजर्स निराश झाले आहेत. कारण कंपनीने गॅलेक्सी S21 सिरीजमधील मायक्रो SD कार्ड स्लॉट हटवला आहे. त्यामुळे तुम्ही या फोनमध्ये मेमरी कार्ड टाकू शकत नाही. केवळ इंटर्नल स्टोरेजवरच तुम्हाला अवलंबून राहावा लागणार आहे.

कशी आहे सॅमसंग गॅलेक्सी एस 21 सिरीज

गॅलेक्सी एस 21 मध्ये 6.2 इंचांचा फुल-एचडी+ इन्फिनिटी-ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याची पिक्सेल डेन्सिटी 421ppi इतकी आहे. याचा पॅनल फ्रंट कॅमेरासाठी एक पंच-होलचं काम करतो. गॅलेक्सी S21+ थोडा मोठा आहे. याचा डिस्प्ले 6.7 इंचांचा आहे. या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 394ppi इतकी आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रा हा स्मार्टफोन S21 आणि S21+ या दोन्ही फोन्सपेक्षा मोठा आहे. या फोनच्या डिस्प्लेची पिक्सेल डेन्सिटी 515ppi इतकी असून डिस्प्ले 6.8 इंचांचा आहे. गॅलेक्सी एस 21 अल्ट्राचा डिस्प्ले गॅलेक्सी नोट सिरीजच्या एस पेनला सपोर्ट करतो.

शानदार कॅमेरा आणि बॅटरी

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास S21 आणि S21+ ममध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64-मेगापिक्सलचा आहे, सेकेंडरी कॅमरा 12-मेगापिक्सल आणि वाईड-अँगल लेन्स 12-मेगापिक्सलची आहे. यामध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सेकेंडरी कॅमरा 12 मेगापिक्सलचा आणि दोन लेन्स 10-10 मेगापिक्सलच्या देण्यात आल्या आहेत. गॅलेक्सी S21 अल्ट्रामध्ये 40-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

गॅलेक्सी S21 मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. गॅलेक्सी S21+ मध्ये 4800mAh ची तर S21 Ultra मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तिन्ही फोन 25W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.

किंमत किती?

सॅमसंगने घोषणा केली आहे की, गॅलेक्सी एस 21 ची किंमत 799 डॉलर (जवळपास 58 हजार रुपये), गॅलेक्सी S21 + ची किंमत 999 डॉलर (जवळपास 73 हजार रुपये) आणि गॅलेक्सी एस 21 अल्ट्राची किंमत 1199 डॉलर (जवळपास 87 हजार रुपये) इतकी आहे.

हेही वाचा

शाओमीच्या Mi 10i फोनची बंपर विक्री, पहिल्याच सेलमध्ये तब्बल 200 कोटींची उलाढाल

यावर्षीच्या सुरुवातीलाच ढासू स्मार्टफोन्स लाँच होणार, फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धडाका

सेल्फी कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, 7 हजारांहून कमी किमतीतील Best स्मार्टफोन

Samsung ने तब्बल 75 तोळे सोनं वापरुन बनवला स्मार्टफोन, किंमत ऐकून थक्क व्हाल

(Samsung Trolls itself by not giving Charger and Earphones with Galaxy S21 box)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.