शाओमीच्या Mi 10i फोनची बंपर विक्री, पहिल्याच सेलमध्ये तब्बल 200 कोटींची उलाढाल

कमी किमतीत तगडे फिचर्स देणारी कंपनी अशी ओळख असलेल्या शाओमीने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड केला आहे. या कंपनीने लाँच केलेल्या Mi 10i या स्मार्टफोनची बंपर विक्री झाली आहे. (xiaomi Mi 10i smart phone)

शाओमीच्या Mi 10i फोनची बंपर विक्री, पहिल्याच सेलमध्ये तब्बल 200 कोटींची उलाढाल

मुंबई : कमी किमतीत तगडे फिचर्स देणारी कंपनी अशी ओळख असलेल्या शाओमीने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड केला आहे. या कंपनीने लाँच केलेल्या Mi 10i या स्मार्टफोनची बंपर विक्री झाली आहे. या फोनच्या पहिल्याच सेलमध्ये तब्बल 200 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. कंपनीने हा फोन सर्व प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध करुन दिला होता. (xiaomi Mi 10i smart phone have huge response have business of 200 crore)

शाओमीने आपल्या Mi 10i या नव्या फोनची विक्री 7 जानेवारी रोजी सुरु केली होती. अ‌ॅमेझॉन प्राईम मेंबर असणाऱ्या ग्राहकांसााठी हा फोन 7 जानेवारी रोजी खरेदीस उपलब्ध करून देण्यात आला होता. तर इतर सामान्य खरेदीदारांसाठी कंपनीने 8 जानेवारीला या फोनचा सेल ठेवला होता. यावेळी दिलेले फिचर्स आणि अपिअरन्समुळे Mi 10i ला प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यानंतर या एकट्या फोनच्या खेदीमुळे बाजारात तब्बल 200 कोटींची उलाढाल झाली. शाओमीने सांगितल्याप्रमाणे (Xiaomi) Mi 10i हा स्मार्टफोन बाजारात आणण्यापूर्वी कल्पना देण्यासाठी तब्बल 10 लाख 50 हजार ग्राहकांनी सांगितलं होतं.

Mi 10i चे फीचर्स काय?

या स्मार्टफोनला 6.67 इंची फुल एचडी डिस्प्ले दिलेला आहे. तसेच फोनची स्क्रीन IPS LCD आहे. तसेच फोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G चे प्रोसेसर असून फोनला 8GB RAM आणि 128GB चे स्टोअरेज आहे. इतरही दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. Mi 10i या स्मार्टफोनला 4,820mAh क्षमतेची बॅटरी दिलेली असून या स्मार्टफोनच्या सीरीजमध्ये 6GB/64GB स्टोअरेज क्षमता असलेल्या फोनची किंमत 20,999 रुपये आहे. तर 6GB/128GB स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत 21,999 आहे. 8GB/128GB स्टोअरेज असलेला फोन ग्राहकांना 23,999 रुपयांमध्ये करेदी करता येईल.

दरम्यान, शाओमीने लाँच केलेल्या या मोबाईलला पहिल्याच सेलमध्ये एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे कंपनीने ग्राहकांचे आभार मनाले आहेत. तसेच ग्राहकांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

‘या’ 5 तगड्या फिचर्समुळे Telegram अ‍ॅप WhatsApp हून दमदार

CES 2021 : Lenovo चा ढासू 11th जनरेशन लॅपटॉप लाँच, जाणून घ्या फिचर्स

यावर्षीच्या सुरुवातीलाच ढासू स्मार्टफोन्स लाँच होणार, फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये धडाका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI