एप्रिल फूल नाही, स्मार्टफोन आणि पार्ट्स खरंच महागणार, कारण…

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण 1 एप्रिलपासून स्मार्टफोनच्या किंमती वाढणार आहे.

एप्रिल फूल नाही, स्मार्टफोन आणि पार्ट्स खरंच महागणार, कारण...

मुंबई : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण 1 एप्रिलपासून स्मार्टफोनच्या किंमती वाढणार आहे. म्हणजेच, आता आपल्याला आपला आवडता फोन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. (Smartphone and its parts will be expensive from April 1, know reason)

यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोबाइल पार्ट्स, चार्जर्स, अ‍ॅडॉप्टर्स, गॅझेट्सच्या बॅटरी आणि हेडफोन्ससारख्या मोबाइल अ‍ॅक्सेसरीजवरील इम्पोर्ट ड्युटीमध्ये 2.5 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. महागड्या मोबाइल पार्ट्समुळे स्मार्टफोनची किंमतही वाढेल, गेल्या 4 वर्षांचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, या सर्व उत्पादनांच्या किंमतीत सुमारे 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, आपण नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ताबडतोब खरेदी करा, कारण उद्यापासून (1 एप्रिल) स्मार्टफोन आणि इलेक्टॉनिक अ‍ॅक्सेसरीजच्या किंमती वाढणार आहे.

स्मार्टफोनच्या किंमतीत किती वाढ होईल?

कमी बजेट स्मार्टफोनच्या किंमतींबद्दल बोलायचे झाले तर त्यात 100 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. तर मध्यम अर्थसंकल्प आणि प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये बराच फरक असू शकतो. जर 2.5 टक्क्यांनी वाढ झाली तर 10 हजार रुपयांच्या फोनसाठी तुम्हाला 10250 रुपये द्यावे लागतील. अशाच प्रकारे प्रीमियम फोनसाठी आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील.

स्थानिक उत्पादनावर सरकारचा विशेष भर

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते की, सरकारला घरगुती इलेक्ट्रॉनिक निर्मितीला प्रोत्साहन द्यायचे आहे आणि गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. सरकारचा विश्वास आहे की, आयात शुल्क वाढवल्यास बाहेरून येणारा माल महाग होईल आणि अशा परिस्थितीत कंपन्या स्वदेशी माल तयार करण्यावर जोर देतील आणि देशांतर्गत उत्पादनांमुळे फोनची किंमत वाढणार नाही.

किंमती कमी करण्यासाठी कंपन्या अ‍ॅक्सेसरीज काढू शकतात

अ‍ॅपल आणि काही कंपन्यांनी त्यांच्या स्मार्टफोन बॉक्समधून चार्जर आणि इतर गोष्टी काढण्यास सुरुवात केली आहे. असे म्हटले जाते की, जर कंपन्यांना आपले ग्राहक तोडायचे नसतील तर ते सुटे सामान काढून टाकू शकतात आणि वाढीव किंमतीची भरपाई करू शकतात. यासह कंपन्या वायरलेस चार्जिंगवरही भर देत आहेत.

इतर बातम्या

12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

मोबाईल विक्रीत Samsung ची Apple वर मात, फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री

8GB/256GB, क्वाड कॅमेरासह Poco X3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

(Smartphone and its parts will be expensive from April 1, know reason)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI