AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arattai App: इकडं स्वदेशीचा नारा अन ऑफिस तर अमेरिकेत; कंपनीचा पत्ता पाहताच भडकले युझर्स

Zoho Arattai App Address : Zoho कंपनीच्या स्वदेशी मॅसेजिंग आरट्टाई ॲपची सध्या जोरदार चर्चा आहे. तर त्यात एक नवीन वाद सुद्धा उफळला आहे. कंपनी स्वदेशीचा नारा देत असताना तिच्या ऑफिस ॲड्रेसवरून सध्या वाद सुरू झाला आहे. काय आहे दावा?

Arattai App: इकडं स्वदेशीचा नारा अन ऑफिस तर अमेरिकेत; कंपनीचा पत्ता पाहताच भडकले युझर्स
पत्त्यावरून वाद
| Updated on: Oct 25, 2025 | 2:14 PM
Share

Zoho Office in California America : Zoho कॉर्पोरेशनचे स्वदेशी मॅसेजिंग Arattai आरट्टाई ॲप सध्या चर्चेत आहे. स्वदेशी ॲप असल्याने ते झटपट लोकप्रिय झाले आहे. अनेक भारतीय ते अभिमानाने डाऊनलोड करण्यात येत आहे. या इन्स्टंट ॲपला WhatsApp ला स्वदेशी पर्याय म्हणून पाहण्यात येत आहे. पण या सर्व दरम्यान Arattai च्या पत्त्यावरून सध्या वाद उफाळला आहे. एका युझर्सने X या सोशल प्लॅटफॉर्मवर प्रश्न विचारला आहे. युझरने गुगल प्लेस्टोअरवर Arattai App चे डेव्हलपर म्हणजे Zoho Corporation चा पत्ता, adress शेअर केला आहे. त्यावरून ॲपविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे .

कंपनीची अमेरिकेत नोंदणी, पत्ता काय?

गुगल प्लेस्टोअरमध्ये Zoho Corporation चा पत्ता “Pleasanton, CA, United States” असे लिहिलेले आहे. त्याचा अर्थ ही कंपनी अमेरिकेत रजिस्टर आहे हे स्पष्ट होते. त्यावरूनच अनेक युझर्सनी सवाल उपस्थित केला आहे. हे ॲप खरंच भारतात तयार करण्यात आले आहे का, असा सवाल करण्यात येत आहे. Zoho Corporation चे संस्थापक श्रीधर वेंबु यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी अमेरिकेचा पत्ता का नोंदवला याचा खुलासा केला आहे.

Zoho संस्थापकांनी दावा फेटाळला

वेंबु यांनी याविषयी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा कंपनीचा जुना डेव्हलपर पत्ता आहे. हा पत्ता चाचणी दरम्यानचा असल्याचा दावा केला आहे. या कंपनीचा खरा डेटा हा भारतातच जतन केल्याचे म्हटले आहे. जुना पत्ता अद्यापही बदलवण्यात आला नसल्याचे ते म्हणाले. कंपनीच्या दाव्यानुसार, भारतात मुंबई,दिल्ली आणि चेन्नईत त्यांचे सर्व्हर आहे. सारा युझर्सचा डेटा येथेच जतन करण्यात येतो. Zoho संस्थापक श्रीधर वेंबु यांनी कंपनी 80 हून अधिक देशांमध्ये आहे. कंपनी अमेरिकेत सुद्धा आहे. या ॲपची प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमुळे कंपनीविरोधात अनेक अफवांचे पीक ऊतू चालल्याचा दावा वेंबु यांनी केला आहे.

अमेरिकेतील पत्ता, कायदेशीर पेचात अडकणार?

सायबर कायदेतज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या ॲपचा पत्ता अमेरिकेत असेल तर ती अमेरिकन कायद्याच्या परिघात येते. याचा अर्थ अमेरिकेतील तपास यंत्रणा या कंपनीकडे युझर्सचा डेटा मागू शकतात. जर Arattai असे करण्यास नकार देत असेल तर Google वा Apple या कंपनीचे ॲप स्टोअरमधून हटवू शकते. तर अमेरिकेतील सूचीत असल्याने आणि भारतात ॲप आणि इतर काम सुरु ठेवल्याने कंपनीला दुहेरी कर भरावा लागू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.