हाय पिक्चर क्वालिटी, QLED तंत्रज्ञान आणि डॉल्बी व्हिजनसह TCL चे दोन 4K टीव्ही बाजारात, किंमत…

हाय पिक्चर क्वालिटी, QLED तंत्रज्ञान आणि डॉल्बी व्हिजनसह TCL चे दोन 4K टीव्ही बाजारात, किंमत...
TCL TV Launch at Kohinoor
Image Credit source: TCL

जागतिक दुसऱ्या क्रमांकाचा एलसीडी टीव्ही ब्रॅण्ड टीसीएलने (TCL) गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर कोहिनूर येथे प्रिमिअम व्हिडिओ कॉल क्यूएलईडी 4के टीव्ही सी 725 (QLED 4K TV C725) आणि 4के एचडीआर टीव्ही पी 725 (4K HDR TV P725) लाँच करत उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर घातली आहे.

अक्षय चोरगे

|

Mar 29, 2022 | 3:53 PM

मुंबई : जागतिक दुसऱ्या क्रमांकाचा एलसीडी टीव्ही ब्रॅण्ड टीसीएलने (TCL) गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर कोहिनूर येथे प्रिमिअम व्हिडिओ कॉल क्यूएलईडी 4के टीव्ही सी 725 (QLED 4K TV C725) आणि 4के एचडीआर टीव्ही पी 725 (4K HDR TV P725) लाँच करत उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर घातली आहे. टीसीएल क्यूएलईडी 4के टीव्ही सी 725 मध्ये हाय पिक्चर क्वॉलिटीसह क्यूएलईडी तंत्रज्ञान व डॉल्बी व्हिजन आहे. तसेच या टीव्हीमध्ये अनेक कनेक्टीव्हीटी वैशिष्ट्यांसह व्हिडिओ कॉल आहे. क्यूएलईडी टीव्ही अपवादात्मक पिक्चर क्वॉलिटीसाठी आकर्षक कलर्स, सुधारित कॉन्ट्रास्ट आणि अद्वितीय सुस्पष्टतेची खात्री देतो, तसेच गुगल ड्युओ अॅपच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ कॉल्स करण्याची सुविधा देतो. सी725 मध्ये स्मार्ट यूआय, गतीशील रिफ्रेश रेट, एमईएमसी व एआयपीक्यू इंजिन आहे, जे वास्तविक रूपात पिक्चर दिसण्याची खात्री देतात.

गुगल असिस्टण्टच्या माध्यमातून युजर्स चॅनेल्स बदलू शकतात, आवाज अॅडजस्ट करू शकतात, प्लेबॅक नियंत्रित करू शकतात आणि त्‍यांच्या वॉईस कमांडसह अ‍नेक गोष्टी नियंत्रित करू शकतात. टीसीएल नवोन्मेष्कारांना सादर करते, जेथे तंत्रज्ञानाला आधुनिक डिझाइन्सची जोड आहे.

मॅजिकल वेब कॅमेरा, शानदार फंक्शन्स

टीसीएल स्मार्ट एआय व अँड्रॉइड आर(11) ची शक्ती असलेल्या पी 725 मध्ये अत्याधुनिक इंटेलिजण्ट फंक्शन्स व अनेक मनोरंजन अनुभव देण्यासाठी मॅजिकल वेब कॅमेरा आहे. प्रेक्षकांना एमईएमसीच्या माध्यमातून अत्यंत सुलभ व्हिज्युअल्सचा देखील आनंद मिळतो. हा टीव्ही अधिक इंटरअॅक्टिव्ह कार्यक्षमता व सर्वोत्तम मनोरंजनासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा टीव्ही प्रत्येक कोप-यामधून आकर्षक दिसतो आणि या टीव्हीमध्ये मेटलिक स्लिम बेझेल-लेस डिझाइन व इन्वर्टेड व्ही-शेप स्टॅण्डसह फॅब्रिक स्टॅक आहे, जे टीव्हीच्या मध्यभागी असून त्यामध्ये पॉवर एलईडी आहे.

QLED 4K TV C725 ची किंमत

गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर व्हिडिओ कॉल क्यूएलईडी 4के टीव्ही सी 725 कोहिनूर येथे 53,990 रूपये या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. ब्रॅण्ड पहिल्यांदाच अर्ली बर्ड ऑफर्ससाठी नियोजन करत आहे, जेथे ब्रॅण्ड 17000 रूपयांचे ब्ल्यूटूथ स्पीकर्स मोफतपणे देईल. यासोबत ग्राहकांना 2999 रूपयांचा व्हिडीओ कॉल कॅमेरा देखील मोफत मिळेल (ही ऑफर 10 एप्रिल 2022 पर्यंत वैध आहे). ग्राहकांना अतिरिक्त 10 टक्के कॅशबॅक आणि अधिक आकर्षक ऑफर्सचा देखील आनंद घेता येईल.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें