Explain : भारतात टेक क्रांती! Made in India चिप आहे तरी काय? सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज महासत्तांचा गेमच पालटणार
Made in India Chip : भारताची पहिली Made in India सेमीकंडक्टर चीपने टेक क्रांती आणली आहे. एक छोटीशी चिप कशी काय टेक क्रांती घडवून आणू शकते, असा सवाल अनेकांना पडला आहे. काय आहे त्याचे उत्तर? जाणून घ्या...

भारताने महासत्तांना जोरदार धक्का दिला आहे. जगात तंत्रज्ञान झपाट्याने कात टाकत आहे. दिवसागणिक अनेक गॅझेट आणि तंत्रज्ञान विकसीत होत आहेत. या तंत्रज्ञानाचा आत्मा ही एक सेमीकंडक्टर चिप ठरणार आहे. हे तंत्रज्ञान काही वर्षांपूर्वी चीन, अमेरिकेची मक्तेदारी होती. महासत्तांच्या या ठेकेदारीला भारताने पहिला झटका दिला आहे. एका छोटी चिप तयार करून भारत आता तंत्रज्ञान क्षेत्रात तांडव करणार आहे. मोदी सरकारच्या डिझाईन लिंक्ड इन्स्टेटिव्ह (DLI) योजनेने या क्षेत्रात भारताचा दबदबा वाढणार आहे. अनेक लोकांच्या मनात हा सवाल आहे की, सेमीकंडक्टर चिप असते तरी काय? जगात या छोट्याशा चिपवरून इतका गदारोळ आणि चढाओढ कशामुळे आहे? डिजिटल...
