QR Code Scam | क्यू आर कोड स्कॅन करताच खात्यातील रक्कम साफ, काय आहे हा घोटाळा?

QR Code Scam | ऑनलाईन पेमेंटसाठी सर्वच जण QR Code चा वापर करतात. झटपट आणि विना झंझट पेमेंट होत असल्याने डिजिटल पेमेंटचा वापर वाढला आहे. पण त्याचा फायदा काही हँकर्स घेत आहेत. आता क्यूआर कोड स्कॅम समोर येत आहे. काय आहे हा घोटाळा? त्यापासून तुम्ही वाचणार कसे? कसा होतो हा स्कॅम?

QR Code Scam | क्यू आर कोड स्कॅन करताच खात्यातील रक्कम साफ, काय आहे हा घोटाळा?
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 10:48 AM

नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : लोकांना फसविण्यासाठी सायबर भामटे अनेक यु्क्त्या वापरतात. सायबर सिक्युरिटी कंपन्यांनुसार, हे सायबर गुन्हेगार लोकांना ठगवण्यासाठी फिशिंग लिंक पाठवतात. त्यामाध्यमातून फसवणूक करतात. गेल्या काही वर्षात ऑनलाईन खरेदी वाढली आहे. अनेकजण स्वस्त आणि माफक दरात सामान खरेदीसाठी सहज गुगल करतात. त्यात अनेक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म समोर येतात. काही नावाजलेले तर काही माहिती नसलेले प्लॅटफॉर्म दिसतात. टेलेग्राम, व्हॉट्सअप यामाध्यमातूनही ऑनलाईन वस्तू खरेदीसाठीचे मॅसेज येतात. त्यात एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ऑनलाईन पेमेंटसाठी QR Code ई-मेल अथवा व्हॉट्सअपवर पाठविण्यात येतो. तो स्कॅन करण्यास सांगण्यात येते. नेमके इथंच या सायबर भामटच्यांचे फावते…

कसा होतो हा घोटाळा

ग्राहकांना चांगला परताव्याचे, गिफ्टचे आमिष दाखविण्यात येते. क्यूआर कोड फिशिंग लिंक आणि स्कॅम पेज इनकोडेड असते. युझर्सने या कोड स्कॅन केल्यावर ते घोटाळ्याचे शिकार होतात. वापरकर्त्याने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पासवर्ड टाकल्यावर त्याची इंत्यभूत माहिती चोरण्यात येते. भेटवस्तू सोडा ग्राहकाचे सर्व खातेच खाली करण्यात येते. अनेक स्कॅमर्स असे क्यूआर कोड दुकानांवर आणि इतर ठिकाणी चिकटवत असल्याचे पण समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

आमिषापासून सावध रहा

कोड स्कॅन करताच ग्राहकाचा मोबाईल हॅक होतो. मोबाईलचा डेटा हॅकर्सकडे जातो. मोबाईलमधील फोटो, तुमची वैयक्तिक माहिती, याचा पण गैरवापर होऊ शकतो. काही प्रकरणात ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडले आहे. मोबाईलमध्ये हे सायबर चाचे मेलवेअर पण डाऊनलोड करु शकतात.

काय असतो फिशिंग अटॅक

या सारख्या घोटाळ्यात तुम्ही एक प्रकारे सावज असता. काही आमिष दाखवले की ग्राहक लागलीच वस्तू खरेदीसाठी दिलेल्या सूचनांचे मुकाट पालन करतो. एकदा त्याने हा क्यूआर कोड स्कॅन केला की हँकर्सचे फावते. तो मोबाईल हॅक करतो आणि बँक खात्यातील रक्कम चोरतो. व्हॉट्सअप, टेलेग्राम आणि ईमेलच्या माध्यमातून हा घोटाळा होत असल्याचे समोर येत आहे.

वाचाल तर वाचाल

इंटरनेटच्या मायाजाळात तुम्हाला सतत सतर्क आणि सावध राहणे गरजेचे आहे. तुम्हाला अनेक गोष्टींचे लक्ष ठेवावे लागते. डोळे झाकून तुम्हाला विश्वास ठेवता येत नाही. क्यूआर कोड स्कॅन करण्याचा कोणताही संदेश आला असेल तर खात्री करुनच तो स्कॅन करा. असा ईमेल आला असेल तर ते धोक्याचे ठरु शकते. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. पेमेंट करण्याची घाई करु नका. नाहीतर तुमचे एक चुकीचे पाऊल, तुम्हाला आर्थिक फटका देऊ शकते.

मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.