AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीएसएनएल कंपनीच्या या किमतीच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 19 दिवसांनी झाली कमी, आत फक्त इतकेच दिवस घेता येणार लाभ

बीएसएनएलने पुन्हा एकदा त्यांच्या इतक्या रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​वैधता कमी केली आहे. या प्लॅनची ​​वैधता यापूर्वी किती होती आणि आता अचानक कमी का केली हे आपण आजच्‍या लेखात जाणून घेऊयात.

बीएसएनएल कंपनीच्या या किमतीच्या रिचार्ज प्लॅनची वैधता 19 दिवसांनी झाली कमी, आत फक्त इतकेच दिवस घेता येणार लाभ
BSNLImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Mar 27, 2026 | 8:11 AM
Share

भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने त्यांच्या 197 रूपयांच्या प्रीपेड प्लॅनच्या वैधतेमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मात्र हा धक्का ग्राहकांना जोरदार बसला आहे. बीएसएनएलच्या 197 रूपयांच्या प्लॅनमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक बदल झाले असून, प्रत्येक वेळी त्याची वैधता कमी करण्यात आली आहे. यापूर्वी, कंपनीने जुलै 2025 मध्ये वैधता कमी केली होती आणि आता, अवघ्या काही महिन्यांनंतर, या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता पुन्हा एकदा कमी करण्यात आली आहे.

टेलिकॉमटॉकच्या माहितीनुसार बीएसएनएलच्या 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये पूर्वी 70 दिवसांची वैधता होती, परंतु ती शेवटची 54 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली होती आणि आता कंपनीने पुन्हा एकदा वैधता 35 दिवसांपर्यंत कमी केली आहे. म्हणजेच 197 रुपयांचा प्लॅन आणि 35 दिवसांच्या वैधतेनुसार, दैनंदिन खर्च अंदाजे 5.63 रुपये येतो.

वैधतेबद्दल जाणून घेतल्यानंतर आपण आता या प्लॅनसोबत मिळणारा डेटा आणि इतर फायदे जाणून घेऊयात. या प्लॅनमध्ये 5 जीबी हाय-स्पीड डेटा आणि 100 एसएमएस मिळतात.

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, या प्लॅनमध्ये 300 मिनिटांचे व्हॉईस कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा मिळतो. तसेच 5 जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड 40 केबीपीएस पर्यंत कमी होईल. बीएसएनएलचा 197 रुपयांचा प्लॅन देशभरातील वापरकर्त्यांसाठी अद्ययावत लाभांसह उपलब्ध आहे. तुम्ही हा प्लॅन बीएसएनएल सेल्फकेअर किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज करू शकता.

एअरटेल 199 रूपयांच्या प्लॅनची ​​माहिती

एअरटेलच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मेसेजेससुद्धा मिळतात. अतिरिक्त फायद्यांमध्ये 12 महिन्यांच्या वैधतेसह ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियमचा समावेश आहे, ज्याची किंमत अंदाजे 4 हजार रुपये आहे. या प्लॅनमध्ये दर 30 दिवसांनी एकदा मोफत हॅलोट्यून, स्पॅम अलर्ट्स आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले सुद्धा मिळतात.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय