200 mp कॅमेरा आणि धमाकेदार बॅटरी पॉवरसह Oppo चा ‘हा’ नवीन हँडसेट लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या संभाव्य किंमत
ओप्पो कंपनी त्यांचा नवीन Reno 15 Pro Max स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार हा फोन कलरओएस 16 वर चालण्याची अपेक्षा आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण हो स्मार्टफोन कधी लाँच होणार आहे आणि याची संभाव्य किंमत किती असणार आहे ते जाणून घेऊयात.

ओप्पो कंपनीचा नवीन Oppo Reno 15 या स्मार्टफोनची लाँचिंग टाइमलाइन आणि स्पेसिफिकेशनची माहिती अलीकडेच ऑनलाइनद्वारे समोर आली आहे. आता कंपनीचा चर्चेत असलेल्या रेनो 15 सीरिज अंतर्गत हा एक नवीन हँडसेट लाँच करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या फोनला ओप्पो रेनो 15 प्रो मॅक्स असे म्हटले जाऊ शकते. भारतातील ओप्पो रेनो 15 प्रो मॅक्सची अपेक्षित किंमत आणि लाँच टाइमलाइन एका टिपस्टरने त्याच्या प्रमुख स्पेसिफिकेशनसह लीक केली आहे. हा फोन ओप्पो रेनो 14 प्रोचा सक्सेसर असू शकतो किंवा रेनो लाइनअपमध्ये आणखी एक नवीन एडिशन असू शकतो.
ओप्पो रेनो 15 प्रो मॅक्सची अपेक्षित किंमत आणि लाँच टाइमलाइन
लवकरच लाँच होणाऱ्या ओप्पो रेनो 15 प्रो मॅक्सची किंमत भारतात सुमारे 55,000 असू शकते. या वर्षाच्या अखेरीस हा फोन चीनमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2026च्या म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा हँडसेट भारतासह इतर बाजारपेठांमध्ये डेब्यू करू शकतो.
तर रेनो 15 प्रो मॅक्स या फोनची आधीची जनरेशन म्हणजेच Oppo Reno 14 Pro 5G जुलैमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता, तर 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंट असलेल्या या फोनची किंमत 49,999 पासून सुरू होते आणि 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असलेले हे टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल 54,999 मध्ये लाँच करण्यात आले होते. हे पर्ल व्हाइट आणि टायटॅनियम ग्रे रंगांमध्ये लाँच करण्यात आले होते.
ओप्पो रेनो 15 प्रो मॅक्सची संभाव्य फिचर्स
स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत, अहवालांनुसार ओप्पो रेनो 15 प्रो मॅक्समध्ये 6.78-इंचाचा 1.5K फ्लॅट LTPO OLED स्क्रीन असेल ज्याचा रिफ्रेश रेट 1Hz ते 120Hz असेल.
हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9400 चिपसेटने चालवला जाईल आणि 6,500mAh बॅटरी पॉवर दिला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित कलरओएस 16 चालवेल अशी अपेक्षा आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, Oppo Reno 15 Pro Max मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 200MP Samsung HP5 प्रायमरी कॅमेरा असेल. यात 50MP टेलिफोटो कॅमेरा आणि अल्ट्रावाइड सेन्सर देखील असू शकतो. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये 50MP सेल्फी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे, जो व्हिडिओ कॉलिंगसाठी देखील वापरला जाईल. यात कंपनीची कस्टम LUMO कॅमेरा तंत्रज्ञान असण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त, ओप्पो रेनो 15 प्रो मॅक्समध्ये वाय-फाय 7 आणि एनएफसी कनेक्टिव्हिटी असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे.
