AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तम फीचर्ससह 6500mAh बॅटरी पॉवर असलेला Huawei चा ‘हा’ स्लिम फोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Huawei कंपनीचा हा फोन ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. फक्त 6.6 मिमी जाडी असलेल्या या फोनमध्ये पॉवरफूल प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम, 50-मेगापिक्सेल क्वाड रिअर कॅमेरा आणि 6500mAh ची दमदार बॅटरी आहे. चला तर मग या स्लिम फोनची किंमत किती असेल हे जाणून घेऊयात.

उत्तम फीचर्ससह 6500mAh बॅटरी पॉवर असलेला Huawei चा 'हा' स्लिम फोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
HarmonyOSImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Nov 08, 2025 | 7:11 PM
Share

आजकाल अनेक कंपनीचे स्मार्टफोन बाजारपेठेत लाँच होत असतात. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक कंपन्या त्यानुसार फोन बाजारात आणत असतात. अशातच आपल्यापैकी अनेकजण स्मार्टफोन खरेदी करताना फोनची जाडी बघून खरेदी करत असतात. तर यावेळी Huawei कंपनीने त्यांचा Huawei Mate 70 Air हा फोन ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. हुआवेई कंपनीचा हा फोन स्लिम डिझाईनमध्ये लाँच केला असुन त्याची जाडी फक्त 6.6mm आहे. फिचर्सच्या बाबतीत या फोनमध्ये किरिन प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे. हँडसेटमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप, 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 6500mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. तर आजच्या या लेखात आपण या स्लिम फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेऊयात.

हुआवेई मेट 70 एअर स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: HarmonyOS 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या या हँडसेटमध्ये 7-इंचाचा फुल-एचडी+ रिझोल्यूशन AMOLED डिस्प्ले आहे जो 300Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या नवीनतम फोनमध्ये 16 जीबी रॅम व्हेरिएंटमध्ये किरिन 9020ए प्रोसेसर आणि 12जीबी मॉडेलमध्ये किरिन 9020बी प्रोसेसर वापरण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज तुम्हाला मिळणार आहे.

कॅमेरा: फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 1.5 मेगापिक्सेलचा मल्टी-स्पेक्ट्रल कलर कॅमेरा आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रायमरी आणि टेलिफोटो दोन्ही कॅमेरे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतात. फ्रंट बाजूस 10.7 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे, जो 4K रिझोल्यूशनपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.

कनेक्टिव्हिटी: हा फोन ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS, GLONASS, QZSS, NavIC, Galileo आणि BeiDou ला सपोर्ट करतो. सुरक्षिततेसाठी हँडसेटमध्ये पॉवर बटणमध्ये एका बाजूला बसवलेला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याचा अर्थ पॉवर बटण केवळ फोन चालू किंवा बंद करण्यासाठीच नाही तर फिंगरप्रिंट सेन्सर वापरून फोन अनलॉक करण्यासाठी देखील वापरला जातो.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 66 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली पॉवरफुल असलेली 6500 mAh बॅटरी देण्यात आली आहे, हा फोन वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत नाही.

हुआवेई मेट 70 एअर किंमत

या नवीनतम हुआवेई फोनची किंमत 12 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 4,199 चिनी युआन म्हणजे भारतीय चलनानुसार अंदाजे 52,000 आहे. तर यामध्ये असलेल्या 12 जीबी रॅम/512 जीबी स्टोरेज व 16 जीबी रॅम/256 जीबी आणि 16 जीबी/512 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 4,699 चिनी युआन आपल्या भारतीय चलनात यांची किंमत 58,000 रूपये इतकी आहे. यातील टॉप व्हेरिएंटची किंमत 5,199 चिनी युआन अंदाजे 65,000 भारतीय किंमत आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.