थॉमसनने लाँच केली बजेट वॉशिंग मशीन… किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घ्या…

थॉमसनने लाँच केली बजेट वॉशिंग मशीन... किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घ्या...
थॉमसन
Image Credit source: tv9

थॉमसनने नुकतेच बजेट सेगमेंटमध्ये आपले नवीन प्रोडक्ट लाँच केले आहेत. कंपनीने परवडणाऱ्या किमतीत दोन वॉशिंग मशिन लाँच केल्या आहेत. तुम्ही हे प्रोडक्ट फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता तसेच त्याच्या स्पेसिफिकेशन्सबाबत अधिक माहितीही घेउ शकतात. नुकताच फ्लिपकार्टवरील एंड ऑफ सिजन सेल संपला असला तरी अजूनही विविध इलेक्ट्रिक वस्तूंवर आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Jun 18, 2022 | 10:07 PM

थॉमसनने (Thomson) भारतीय बाजारपेठेत वॉशिंग मशिनची (Washing Machine) नवीन सिरीज लाँच केली आहे. ब्रँडने इनबिल्ट हीटरसह ऑटोमॅटीक वॉशिंग मशीन आणले आहे. केवळ इनबिल्ट हीटरच (Inbuilt heater) नाही तर वनटच फंक्शन, कमी पाण्याचा दाब, रिंकल फ्री वॉश यांसारखी इतर फीचर्स देखील या नवीन डिव्हाइसमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीने 8Kg आणि 9Kg क्षमतेच्या दोन पूर्णपणे ऑटोमॅटीक वॉशिंग मशीन लाँच केल्या आहेत. दोन्ही मशीनमध्ये अनेक अपग्रेट फीचर्स उपलब्ध आहेत. खासकरुन नोकरीवर किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असलेल्या गृहिणींसाठी ही मशिन अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यात मशिनने धुतल्यावर पडणारे डागही पडत नसल्याने कपडे अगदी नीट स्वच्छ होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. त्यांची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबाबत या लेखातून माहिती घेणार आहोत.

काय आहे ऑफर?

थॉमसनने 8Kg आणि 9Kg क्षमतेची दोन प्रोडक्ट लाँच केली आहेत. तुम्ही त्यांना अनुक्रमे 15,999 आणि 16,999 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनीची उत्पादने फ्लिपकार्टवर उपलब्ध असून तुम्ही हे प्रोडक्ट 18 जूनपासून खरेदी करू शकाल. तुम्हाला फ्लिपकार्टवर ब्रँडची इतर प्रोडक्ट व विविध मशिन्सदेखील उपलब्ध असतील. कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 7,490 रुपयांपासून सुरू होत असून ही किंमत 6.5Kg क्षमतेच्या मशिनच्याच्या हाफ ऑटोमॅटीक टॉप लोड प्रोडक्टसाठी आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत फीचर्स ?

थॉमसनच्या नवीन प्रोडक्टमध्ये ग्राहकांना इनबिल्ट हीटर मिळते, जे अधिक चांगल्या पद्धतीने कपडे धुण्यास मदत करतो. कंपनीची बहुतांश प्रोडक्ट आकर्षक किमतींच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. ब्रँडनुसार, नवीन वॉशिंग मशीनमध्ये 99.9 टक्केपर्यंत बॅक्टेरिया काढून टाकले जातात. मशीन तीन वेगवेगळ्या तापमानात पाणी गरम करते. यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. विशेषत: वन टच वर्क, कपडे भिजवणे, धुणे आणि मिक्स करणे. ब्रँडचे म्हणणे आहे, की नवीन प्रोडक्टमध्ये कमी पाण्याच्या प्रेशरवर काम करते, ज्यामुळे विजेची बचत होत असल्याचा दावा केला जात आहे. चाइल्ड लॉक आणि मेमरी फंक्शन सारखी फीचर्सही यात उपलब्ध आहेत. थॉमसन वॉशिंग मशीनमध्ये फ्री रिंकल फ्री वॉशिंग मिळत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें