AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 कोटी युजर्सना तीन महिने मोफत इंटरनेटची सुविधा; जाणून घ्या व्हॉट्स अ‍ॅपवरील व्हायरल मेसेजची सत्यता

सरकारी संस्था असलेल्या प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (पीआयबी) या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजमागील बनावटगिरीचा खुलासा केला आहे. हा मेसेज पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचे पीआयबीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. (Three months free internet for 10 crore users; know the truth about the viral message on WhatsApp)

10 कोटी युजर्सना तीन महिने मोफत इंटरनेटची सुविधा; जाणून घ्या व्हॉट्स अ‍ॅपवरील व्हायरल मेसेजची सत्यता
आयफोन वापरकर्त्यांसाठी खूशखबर, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटचे फिचर लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर होणार उपलब्ध
| Updated on: Jun 01, 2021 | 7:16 PM
Share

नवी दिल्ली : एका व्हॉट्स अ‍ॅप मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार देशातील लाखो युजर्सना विनामूल्य इंटरनेट देणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. लोक हा मेसेज अधिकाधिक शेअर करीत आहेत. परंतु वास्तव तपासले असता हा मेसेज खोटा आणि कल्पित आहे. देशातील युजर्सना इंटरनेट फ्री देण्याच्या निर्णयाबद्दल सरकारने कुठलीही घोषणा केलेली नाही. (Three months free internet for 10 crore users; know the truth about the viral message on WhatsApp)

सरकारी संस्था असलेल्या प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने (पीआयबी) या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजमागील बनावटगिरीचा खुलासा केला आहे. हा मेसेज पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचे पीआयबीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. सोशल मीडियात सरकारच्या निर्णयासंबंधी ज्यावेळी कोणत्याही पोस्ट, मेसेजेस व्हायरल केले जातात. त्यावेळी त्या मेसेजची सत्यता आहे की नाही, या अनुषंगाने पीआयबी संस्थेमार्फत खुलासा केला जातो. त्या-त्या पोस्टमागील सत्य वस्तुस्थिती समोर आणण्याचे काम पीआयबीमार्फत केले जाते. व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल होत असलेल्या फ्री इंटरनेट दाव्याच्या बनावटगिरीचाही पीआयबीने पर्दाफाश केला आहे.

पीआयबी या व्हायरल मॅसेजबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे, व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये भारत सरकार 3 महिन्यांकरीता 10 कोटी युजर्सना इंटरनेटची मोफत सुविधा उपलब्ध करणार असल्याचे नमूद केले आहे. हा दावा आणि लिंक बनावट आहे. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नाही. अशा बनावट वेबसाइटपासून सावध राहा, असे सावधगिरीचे ट्विट पीआयबीने केले आहे.

पूर्णपणे फेक आहे मॅसेज

संबंधित व्हॉट्स अ‍ॅप मेसेज पूर्णपणे एका फ्रॉडचा अर्थात घोटाळ्याचाच भाग आहे. मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे आणि त्यात लिहिलेले आहे, ‘भारत सरकारकडून मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी सर्व भारतीयांना 3 महिन्यांचा रिचार्ज फ्री दिला जात आहे. जर तुमच्याकडे जियो, एअरटेल किंवा व्होडाफोन आयडियाचे सिमकार्ड असेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.

मेसेजमध्ये नेमके काय लिहिलेय?

व्हायरल मेसेजमध्ये पंतप्रधानांच्या छायाचित्राबरोबरच मोबाईल कंपन्यांचे फोटो लावलेले आहेत. फोटोवर लिहिलेले की 1 सिम कार्ड निवडा आणि तीन महिन्यांसाठी मोफत इंटरनेट मिळवा. ही ऑफर 29 जून 2021 पर्यंतच उपलब्ध आहे. आतापर्यंत या ऑफरचा 95185 युजर्सनी फायदा घेतला आहे. पीआयबीने हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पीआयबीने ट्वीटमध्ये लिहिले आहे की या मेसेजमध्ये पोस्ट केलेले दावे आणि लिंक बनावट आहेत. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. अशा कोणत्याही बनावट वेबसाईटवर नोंदणी करू नका. अशा बनावट लिंकवर क्लिक केल्यास आपली वैयक्तीक माहिती हॅकर किंवा फ्रॉडस्टरपर्यंत पोहोचते. त्यातून आपल्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारला जाण्याची भिती असते. (Three months free internet for 10 crore users; know the truth about the viral message on WhatsApp)

इतर बातम्या

राज-उद्धव एकत्र येतील काय?; आकाशाकडे हात दाखवत राज म्हणाले…

‘तिने स्वतःच भिंतीवर डोकं आपटलं आणि माझ्यावर…’, करण मेहराने सांगितलं त्या दिवशी काय नेमकं घडलं?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.