AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही करा आराम! कॉलवर तुमच्या आवाजात AI बोलणार, Truecaller घेऊन येतोय भन्नाट फीचर

Truecaller AI Assistant : ट्रूकॉलर लवकरच एक भन्नाट फीचर घेऊन येत आहे. तुमची कॉलवर बोलण्याची इच्छा नसली अथवा तुम्ही कामात गुंतलेले असाल तर हे एआय फीचर तुमच्या आवाजात समोरच्याशी बोलेल, त्यासाठी ट्रूकॉलर Microsoft ची मदत घेणार आहे.

तुम्ही करा आराम! कॉलवर तुमच्या आवाजात AI बोलणार, Truecaller घेऊन येतोय भन्नाट फीचर
ट्रूकॉलरचे नवीन भन्नाट एआय फीचर
Updated on: May 24, 2024 | 11:25 AM
Share

Truecaller AI Voice Assistant : अनेकदा कामाच्या गडबडीत अथवा कोणाशी बोलण्याचा मूड नसला तर आपल्याला कॉलवर कोणाशी बोलता येत नाही. पण आता ट्रूकॉलर तुमची ही अडचण सहज सोडवणार आहे. कॉल आला तर कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (AI) मदतीने तुमच्या आवाजात समोरली व्यक्तीशी हे फीचर संवाद साधणार आहे. समोरच्या व्यक्तीला त्याची जराशी कल्पना पण येणार नाही की तो तुमच्याशी बोलला की या ट्रूकॉलर एआय व्हाईस असिस्टंट बोलला. काय आहे हे भन्नाट फीचर? जाणून घ्या…

लवकरच AI व्हर्झन बाजारात

कॉलर आयडी सर्व्हिस ट्रूकॉलर लवकरच लोकांना AI व्हर्झनची सुविधा देणार आहे. ग्राहक त्यांच्या AI व्हर्झनमध्ये त्यांचा खरा आवाज जोडतील. त्यामुळे कॉल आल्यावर एआयच्या मदतीने हुबेहुब तुमच्या आवाजात हा एआय व्हाईस असिस्टंट बोलेल. ट्रूकॉलर बोगस कॉल आणि स्पॅम कॉल यांची ओळख करण्यासाठीचे एक ॲप आहे. नवीन एआय व्हाईस असिस्टंट फीचरसाठी ट्रूकॉलरने Microsoft Azure AI Speech सोबत हात मिळवला आहे.

AI वापरेल तुमचा खरा आवाज

  • ट्रूकॉलर इस्त्राईलचे या प्रकल्पाचे संचालक आणि मुख्य व्यवस्थापक राफेल मिमून यांनी एका ब्लॉगमध्ये याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, पर्सनल व्हाईस फीचर युझर्सला त्यांचा आवाज त्यासाठी वापरण्याची परवानगी देतील. त्यानंतर येणाऱ्या कॉलवर डिजिटल असिस्टंट इनकमिंग कॉलवर बोलेल.
  • ही एक मोठी गोष्ट आहे. या फीचरमुळे ग्राहकांना काम करताना एखादा महत्वाचा फोन उचलता तर येईलच. पण कॉल रेकॉर्डिंग बटणाचा उपयोग करुन त्याला हे संभाषण जतन करता येईल. त्यानंतर वेळप्रसंगी त्यातील मुद्दे टिपता येईल. डिजिटल असिस्टंट दिमतीला आल्याने नकोशा कॉलची कटकट राहणार नाही.

Truecaller चे एआय व्हॉईस असिस्टंट

ट्रूकॉलरचे एआय असिस्टंट सर्वात अगोदर 2022 मध्ये दाखल झाले होते. ही सुविधा काही निवडक देशातच मिळते. हे एआय फीचर इनकमिंग कॉल तपासतो. आणि त्याची माहिती देतो. युझर्सला वाटले की त्याच्याऐवजी एआय फीचरची मदत घ्यावी. तर तो मदत घेऊ शकतो. सध्या ट्रूकॉलर असिस्टंटचा आवाज उपयोगात येतो. काही दिवसांनी युझर्सला त्याऐवजी त्याचा आवाज वापरता येईल.

मोफत नाही फीचर

तुम्हाला एआय असिस्टंट फीचर सुरु करायचे असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. ही सेवा मोफत मिळणार नाही. त्यासाठी कंपनीकडून सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. कंपनी नवीन व्हाईस असिस्टंट फीचरची सुरुवात भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, स्वीडन आणि चिलीमध्ये करणार आहे.

ते ज्या प्रकारे वागले..; बैठकीनंतर प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट
ते ज्या प्रकारे वागले..; बैठकीनंतर प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट.
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?
बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?.
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?
मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?.
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब.
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल.
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?.
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप.
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप.
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप.
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला..
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला...