जवळपास 5 कोटी भारतीयांचा Truecaller डेटा डार्क वेबवर लीक, ऑनलाईन इंटेलिजन्सचा दावा

जवळपास 5 कोटी भारतीयांचा Truecaller डेटा डार्क वेबवर लीक, ऑनलाईन इंटेलिजन्सचा दावा
ट्रूकॉलरने लाँच केली हॉस्पिटल डायरेक्टरी

मोबाईल अॅप Truecaller ने 4.7 कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा डार्क वेबवर 75 रुपयात विकण्यासाठी दिला (Truecaller Data Leaked) आहे

सचिन पाटील

| Edited By:

May 28, 2020 | 6:44 PM

मुंबई : मोबाईल अॅप Truecaller ने 4.7 कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा डार्क वेबवर 75 हजार रुपयात विकण्यासाठी दिला (Truecaller Data Leaked) आहे, असा दावा ऑनलाईन इंटेलिजेन्स फर्म Cyble ने आपल्या एका अहवालात केला आहे. Cyble च्या या दाव्यामुळे भारतातील युझर्समध्ये एकच खळबळ उडाली आहे. पण हा दावा Truecaller फेटाळून लावला (Truecaller Data Leaked) आहे.

Truecaller वर उपलब्ध असलेला डेटा 2019 चा आहे. जो डार्क वेबवर राज्य, शहर सारख्या कॅटेगरीमध्ये विभाजीत करुन शेअर करण्यात आला आहे.

लीक केलेल्या डेटामध्ये युझर्सचे नाव, मोबाईल नंबर, प्रोफेशन, जेंडर, ईमेल आयडी, फेसबुक आयडीसह इतर गोष्टींचा समावेश आहे, असं Cyble ने अहवालाता म्हटले आहे. पण Truecaller ने हा आरोप फेटाळून लावला आहे.

Truecaller ने Cyble चा अहवाल फेटाळला

“अशा गोष्टींवर आमचे लक्ष वेधून घेतले त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आमचा कोणताही डेटा लीक झालेला नाही. आमच्या सर्व युझर्सची माहिती सुरक्षित आहे. आम्ही आमच्या युझर्सच्या सुरक्षेची खूप काळजी घेतो आणि आम्ही आमची सेवा इमानदारीने देत आहे”, असं Truecaller च्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Trucaller चे प्रवक्ते म्हणाले, “मे 2019 मध्ये डेटा लीक झाल्याची माहिती मिळाली होती. काही खोट्या कंपन्यांसाठी हे काम सोपे असते. ते अशा प्रकरचा डेटा तयार करुन आमच्या नावाने विकतात. अशामुळे त्यांना मार्केटमध्ये डेटा विकण्यास सोपे पडते. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी अशा खोट्या कंपन्यांच्या आहारी पडू नका, त्यांचे काम फक्त लोकांन फसवणे आणि पैसे कमवणे आहे.”

“आम्ही युझर्सचे फोनबुक अपलोड करत नाही. आमचा डेटा बेस पहिल्यापासून युझर्सने भरलेला आहे. ते स्वत: नंबर अपडेट आणि ब्लॉक करत असतात, असंही Truecaller चे प्रवक्ते म्हणाले. Truecaller च्या या वक्तव्यावर अद्याप Cyble ने काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

संबंधित बातम्या :

‘झूम’ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप सुरक्षित नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून धोक्याचा इशारा

Tik Tok ला टक्कर देण्यासाठी भारतीय Mitron अॅप लाँच, महिनाभरात तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक युझर्स

लॉकडाऊनदरम्यान Whatsapp कडून युझर्ससाठी नवं फीचर लाँच

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें