TVS कंपनीची Apache RR 310 नव्या रुपात लाँच, किंमत तब्बल…

TVS कंपनीची Apache RR 310 नव्या रुपात लाँच, किंमत तब्बल...

मुंबई : TVS या बाईक कंपनीने Apache RR 310 ही फ्लॅगशिप बाईक नवीन रुपात लाँच केली आहे. TVS Apache RR 310 या नवीन बाईकमध्ये अनेक बदल करण्यात आले असून महत्त्वाचं म्हणजे यात स्लिपर क्लच देण्यात आले आहेत. ही बाईक खरेदी करणारा पहिला ग्राहक क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ठरला आहे. नव्या TVS Apache RR 310 […]

Namrata Patil

|

May 27, 2019 | 11:15 PM

मुंबई : TVS या बाईक कंपनीने Apache RR 310 ही फ्लॅगशिप बाईक नवीन रुपात लाँच केली आहे. TVS Apache RR 310 या नवीन बाईकमध्ये अनेक बदल करण्यात आले असून महत्त्वाचं म्हणजे यात स्लिपर क्लच देण्यात आले आहेत. ही बाईक खरेदी करणारा पहिला ग्राहक क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ठरला आहे.

नव्या TVS Apache RR 310 मध्ये थोडासा मॅकेनिकल आणि कॉस्मेटीक बदल करण्यात आला आहे. गेल्या TVS Apache RR 310 च्या तुलनेत या मॉडलच्या किमतीत 3 हजारांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच TVS च्या नव्या बाईकमध्ये स्लीपर क्लच देण्यात आलेत. विशेष म्हणजे आतापर्यंत TVS Apache RR 310 ही बाईक काळ्या रंगात उपलब्ध होती. मात्र आता TVS च्या नव्या बाईकमध्ये काळ्या रंगाच्या नवीन व्हरायटी व लाल रंग  असणार आहे. त्याशिवाय TVS ची नवी बाईकमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाची स्ट्रीपही दिली आहे. यामुळे या बाईकला एक वेगळाच लुक आला आहे. या बाईकची किंमत 2 लाख 27 हजार रुपये आहे.

TVS Apache RR 310 काही खास वैशिष्ट्य

TVS Apache RR 310 या बाईकमध्ये 312.2 cc लिक्विड-कूल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 33.52 bhp पॉवर आणि 27.3 Nm टॉर्क जनरेट करतं. त्याशिवाय या बाईकमध्ये स्लिपर क्लचसोबत 6 स्पीड गियरबॉक्स देण्यात आले आहेत. स्लीपर क्लचमुळे जास्त वेगात असतानाही बाईकचे गियर बदलता येणार आहेत.

त्याशिवाय TVS Apache RR 310 या बाईकमध्ये 310 ची टॉप स्पीड देण्यात आला आहे. ही बाईक अवघ्या 7.17 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगाने पळू शकते, असा दावा कंपनीमार्फत करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

सुझुकीची Gixxer SF 250 लॉन्च, किंमत तब्बल…

डुकाती बाईकच्या खरेदीवर तब्बल 6 लाखांची सवलत, मर्यादित ऑफर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें