AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंसक कंटेंट शेअर करणाऱ्या 70 हजार अकाऊंट्सवर ट्विटरची कारवाई, ट्रम्प समर्थकांनाही दणका

सोशल मीडियावरील हिंसक तसेच चिथावणीखोर पोस्ट्स रोखण्यासाठी ट्विटर आता कडक कारवाई करत आहे.

हिंसक कंटेंट शेअर करणाऱ्या 70 हजार अकाऊंट्सवर ट्विटरची कारवाई, ट्रम्प समर्थकांनाही दणका
| Updated on: Jan 13, 2021 | 11:49 AM
Share

वॉशिंग्टन : सोशल मीडियावरील हिंसक तसेच चिथावणीखोर पोस्ट्स रोखण्यासाठी ट्विटर आता कडक कारवाई करत आहे. गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये हिंसाचार झाला होता, याप्रकरणी काही दिवसांपूर्वी ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केले होते. आता ट्विटरने द्वेषयुक्त आणि हिंसक कॉन्टेंटवर बंदी घालण्यासाठी अधिक कठोर पाऊल उचलले आहे. ट्विटरने सोमवारी याबाबत मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प समर्थक QAnon conspiracy शी संबंधित (प्रो-ट्रम्प क्यूएनॉन कॉन्सपिरसी) 70 हजारांहून अधिक ट्विटर हँडेल्स निलंबित केले आहेत. गेल्या आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीवर हल्ला करत हिंसाचार घडवून आणला होता. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हे कठोर पाऊल उचललं आहे. (Twitter suspended 70000 accounts due to inflammatory content)

ट्विटरने याबाबत म्हटले आहे की, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आणि शहरासह इतर ठिकाणी नुकसान वाढू नये, तसेच पुन्हा हिंसाचार घडून नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून QAnon शी संबंधित कन्टेंट शेअर करणारे हजारे ट्विटर अकाऊंट्स बंद केले आहे. तसेच ट्विटरने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, शुक्रवारी आम्ही 70 हजारांपेक्षा अधिक अकाऊंटस सस्पेंड केली आहेत. काही वेळा अशी प्रकरणे समोर आली आहेत की, एकच व्यक्ती अनेक अकाऊंट वापरत होती, आणि त्या अकाऊंटद्वारे तो हिंसक आणि चिथावणीखोर ट्विट्स करत होता. त्यामुळे त्यांचे ट्विटवर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले.

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी 20 जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्विटरसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स खबरदारी घेताना दिसत आहेत. फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामनेही डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट निलंबित केले आहे. ट्रम्प यांना समर्थन देणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या संघटनांविरोधातही सोशल मीडिया कंपन्या कठोर पाऊल उचलत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर ट्विटरने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्सची आम्ही समीक्षा केली. त्यांच्या ट्विट्समुळे अमेरिकेत दंगे भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला असे ट्विटरने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल त्यांना अमान्य आहे. तेव्हापासून ते गुरुवारी अमेरिकन संसदेवर हल्ला झाल्यानंतरसुद्धा डोनाल्ड ट्रम्प चिथावणीखोर ट्विट करत होते. फेसबुकच्या माध्यमातूनसुद्धा ते अमेरिकन जनतेला भडकवत असल्याचा आरोप होतोय. ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेवर केलेल्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकन संसदेवर ट्रम्प समर्थकांचा धुडगूस

अमेरिकेन संसदेच्या परिसरात अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) प्रचंड धुडगूस घातला. कॅपिटल हिलवर (Capital Hill) झालेल्या या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली होती. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील मतमोजणीवरुन डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आक्रमक झाले होते. ट्रम्प समर्थकांनी मतमोजणी रोखण्याचा प्रयत्न करत कॅपिटल बिल्डींगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना थाबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रम्प समर्थक आक्रमक झाले आणि हिंसेला सुरुवात झाली होती. या घटनेत आतापर्यंत 5 जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान वॉशिंग्टनमधील वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे 15 दिवसांसाठी आणीबाणी लावण्यात आली आहे.

इतर बातम्या

तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही, नव्या Privacy policy बाबत Whatsapp चं स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस ग्रुप लिंक Goggle Search वर लीक, WhatsApp कडून भूमिका जाहीर

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

(Twitter suspended 70000 accounts due to inflammatory content)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.