AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Twitter vs Centre : सरकारचे नवे आयटी नियम ट्विटरने स्वीकारले, 8 आठवड्यात तक्रार अधिकारी नेमणार

ट्विटरने (Twitter) दिल्ली उच्च न्यायालयास सांगितले आहे की, त्यांना नव्या आयटी नियमांचे पालन करून तक्रार अधिकाऱ्याची (Grievance Officer) नेमणूक करण्यास आठ आठवडे लागतील.

Twitter vs Centre : सरकारचे नवे आयटी नियम ट्विटरने स्वीकारले, 8 आठवड्यात तक्रार अधिकारी नेमणार
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 08, 2021 | 11:41 PM
Share

नवी दिल्ली : ट्विटरने (Twitter) दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) प्रतिज्ञापत्र सादर करुन सूचित केलं आहे की, त्यांना नव्या आयटी नियमांचे पालन करून तक्रार अधिकाऱ्याची (Grievance Officer) नेमणूक करण्यास आठ आठवड्यांचा कालावधी लागेल. ट्विटरने कोर्टाला असेही सांगितले आहे की, ते भारतात संपर्क कार्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहेत, जो त्यांचा कायम फिजिकल कॉन्टॅक्ट अ‍ॅड्रेस असेल. (Twitter will follow IT rules of Indian Government, they will appoint Grievance Officer in 8 weeks)

ट्विटरने असेही म्हटले आहे की, ते 11 जुलैपर्यंत नवीन आयटी नियमांनुसार पहिला अनुपालन अहवाल सादर करतील. ट्विटरने म्हटले आहे की, “ट्विटर नवीन आयटी नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत आहे, तथापि ट्विटरने नियमांची वैधता आणि अधिकारांना आव्हान देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. ट्विटरने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, मुख्य अनुपालन अधिकाऱ्यासाठीची भरती प्रक्रिया ट्विटरने सुरु केली आहे.

यापूर्वी केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते की, ट्विटर इंक. नवीन आयटी नियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे, जो देशाचा कायदा आहे आणि त्याचे पालन करणे अनिवार्य आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करत ट्विटरने म्हटले आहे की, ते स्थानिक तक्रार निवारण अधिकारी नेमण्याच्या प्रक्रियेत आहेत.

सोमवारी ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले की, कंपनी नवीन आयटी नियमांतर्गत अंतरिम मुख्य अनुपालन अधिकारी आणि अंतरिम स्थानिक तक्रार अधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, एक तक्रार अधिकारी भारतीय ग्राहकांच्या तक्रारींकडे लक्ष देत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

जेरेमी केसल नवे तक्रार अधिकारी

मीडिया रिपोर्टनुसार ट्विटर कंपनीचे वैश्विक कायदेशीर धोरण संचालक आणि अमेरिकन नागरिक जेरेमी केसल यांना भारतात तक्रार अधिकारी म्हणून नियुक्त करणार आहे. तथापि, नव्या नियमांनुसार या पदावर केवळ भारतीय नागरिकाची नेमणूक करणे गरजेचे आहे.

चतूर यांनी अशा वेळी राजीनामा दिला होता, जेव्हा ट्विटरवर सोशल मीडियाच्या नव्या नियमांवरून सरकारचा हल्ला सुरु होता. ट्विटरने हे नवीन नियम जाणीवपूर्वक न पाळल्याची टीका सरकारने केली आहे.

Google आणि Facebook देखील नमलं

दरम्यान, गुगल (Google) आणि फेसबुक (Facebook) सारख्या बड्या डिजिटल कंपन्यांनी भारतातील नवीन सोशल मीडिया नियमांनुसार (Social Media Rules तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासह इतर माहिती सार्वजनिक करण्याच्या उद्देशाने आपली वेबसाइट अद्ययावत (अपडेट) करणे सुरू केले आहे.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या (WhatsApp) बड्या सोशल मीडिया कंपन्यांनी नवीन डिजिटल नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे (आयटी) विविध तपशील शेअर केले आहेत. तथापि, ट्विटर अद्याप नियमांचे पालन करीत नाही. नवीन नियमांनुसार बड्या सोशल मीडिया मध्यस्थांना तक्रार निवारण अधिकारी, नोडल अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. या अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतात होणे आवश्यक आहे आणि ते येथेच थांबून कामकाज सांभाळतील.

प्रमुख सोशल मीडिया मध्यस्थांच्या श्रेणीत त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची युजर्स संख्या 50 लाखाहून अधिक आहे. उद्योग सूत्रांनी सांगितले की, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे अनुपालन अहवाल शेअर केले आहेत. या नव्या मंचांवर नवीन तक्रार अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची माहिती अद्ययावत केली जात आहे.

गुगल, यूट्यूबने तक्रार निवारण अधिकाऱ्यांविषयी माहिती दिली

गुगलने ‘कांटेक्ट अस’ पेजवर जो ग्रिअरचे नाव दिले आहे. त्याचा पत्ता माउंटन व्ह्यू अमेरिकेचा आहे. या पृष्ठावरील यूट्यूबसाठी तक्रार निवारण यंत्रणेविषयीदेखील माहिती प्रदान केली गेली आहे. नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर, अ‍ॅप किंवा त्या दोन्हीवर तक्रार निवारण अधिकारी आणि त्यांचा पत्ता द्यावा लागतो. तसेच तक्रारीची पद्धत सांगावी लागेल ज्याद्वारे वापरकर्ता किंवा पीडित आपली तक्रार करू शकतात.

इतर बातम्या

Google Photos युजर्स आणि YouTube क्रिएटर्ससाठी वाईट बातमी, ‘या’ सर्व्हिसेस बंद होणार

फेसबुक प्रमाणेच MeWe, Diaspora यासह बरेच सोशल मीडिया पर्याय उपलब्ध, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

(Twitter will follow IT rules of Indian Government, they will appoint Grievance Officer in 8 weeks)

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप