आधार कार्डचा अत्यंत सावधगिरीने वापर करा; यूआयडीएआयने दिला ‘हा’ इशारा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 12, 2021 | 5:35 PM

यूआयडीएआयने अलीकडेच ऑनलाईन घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा दिला आहे. अशा घोटाळ्यांपासून स्वतःचा बचाव करण्याची वेळ आली आहे, असे यूआयडीएआयने एका ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.

आधार कार्डचा अत्यंत सावधगिरीने वापर करा; यूआयडीएआयने दिला 'हा' इशारा
आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची आहे? या कागदपत्रांद्वारे करा अपडेट

नवी दिल्ली : ऑनलाईन घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. घोटाळेखोर आता ओटीपी आणि बनावट लिंकच्या आधारे लोकांना फसवणुकीमध्ये बळीचा बकरा बनवत आहेत. अशा घोटाळेखोरांमुळे तुमच्या आधार कार्डचा वापर करून देखील आर्थिक घोटाळा केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे आधार कार्डशी आपली सगळी माहिती संलग्न केलेली असते. याचाच गैरलाभ उठवत घोटाळेखोरांकडून ऑनलाईन घोटाळा करण्याचे प्रमाण भलतेच वाढले आहे. (Use Aadhar card with extreme caution; UIDAI gave this warning)

यूआयडीएआयने दिला सावधगिरीचा इशारा

यूआयडीएआयने अलीकडेच ऑनलाईन घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा दिला आहे. अशा घोटाळ्यांपासून स्वतःचा बचाव करण्याची वेळ आली आहे, असे यूआयडीएआयने एका ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे. आधार कार्डचा नंबर 12 अंकी असतो. हा नंबर यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून व्हेरिफाय केला जाऊ शकतो. यामुळे तुम्हाला घोटाळेखोरांपासून बचाव होऊ शकतो. त्याचबरोबर कोणत्याही अडचणही येणार नाही. याव्यतिरिक्त आधार कार्डचा ओळखीचा पुरावा म्हणून उपयोग करण्यापूर्वी ते व्हेरिफाय करणे अत्यंत गरजेचे आहे.

आधार कार्ड असे करा व्हेरिफाय

तुम्हाला तुमचे आधार कार्ड व्हेरिफाय करणे आवश्यक आहे. तुम्ही ऑफलाईन व्हेरिफाय करण्यासाठी आधार कार्डवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करू शकता. ऑनलाईन व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला resident.uidai.gov.in/verify ही लिंक उघडून त्या ठिकाणी 12 अंकी आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर तुमचे कार्ड व्हेरिफाय होईल. याव्यतिरिक्त तुम्ही mAadhaar अँपच्या माध्यमातून आधार कार्ड व्हेरिफाय करू शकाल.

आधार कार्ड घोटाळ्यामुळे स्वतःचा असा करा बचाव

– तुम्ही जर कुठल्या सार्वजनिक संगणकावर आधार कार्ड डाऊनलोड केले असेल, तर ते काम झाल्यानंतर लगेच डिलीट करा. – आपला वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) कोणत्याही परिस्थितीत इतरांना सांगू नका. – तुमचा मोबाइल नंबर दुसऱ्याच्या आधार कार्डशी संलग्न करण्यास परवानगी देऊ नका. तसेच तुमच्या आधार कार्डशी दुसऱ्याचा नंबर लिंक करू नका. – नेहमी आधार कार्डच्या व्हर्चुअल आयडीचा वापर करा. यात 16 अंकी आधार कार्ड मिळेल. ज्याचा वापर आधार कार्डच्या बदल्यात करता येईल. – यूआयडीएआय पोर्टलवरून नेहमीच आपल्या बॉयोमेट्रिकला लॉक ठेवा आणि नोंदणीकृत मोबाइल नंबरच्याच साहाय्याने अनलॉक करण्याची व्यवस्था ठेवा.

जाणून घ्या आधार कार्ड लॉक कसे करायचे

आपण आपला आधार कार्ड लॉक करू इच्छित असाल तर प्रथम आपल्या फोनवरील मॅसेज अँप ओपन करा. त्यानंतर GETOTP टाइप करून 1947 क्रमांकावर एसएमएस पाठवा. त्यानंतर आपल्या फोन नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी आल्यानंतर लॉकयुआयडी आणि आधार क्रमांक लिहून पुन्हा 1947 नंबरवर मेसेज करा. यामाध्यमातून तुमचे आधार कार्ड लॉक होईल. (Use Aadhar card with extreme caution; UIDAI gave this warning)

इतर बातम्या

‘हा’ भारतीय खेळाडू खेळतोय काउंटी क्रिकेट, सुट्ट्या मध्येच सोडून परतला मैदानावर, 25 ओव्हरमध्ये दिले केवळ 5 चौकार

इंधनावरील करातून कमावलेल्या 25 लाख कोटींचे काय केले? : मल्लिकार्जुन खरगे

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI