50 मेगापिक्सेल कॅमेरे आणि पॉवरफूल प्रोसेसरसह भारतात लाँच झाला Vivo चा ‘हा’ 5G स्मार्टफोन, जाणून या फोनचे धमाकेदार फिचर्स
Vivo चा हा 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. तर या प्रमुख फिचर्ससह यामध्ये 50MP टेलिफोटो कॅमेरा आणि 6200mAh बॅटरी समाविष्ट आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि उपलब्धता याबद्दल जाणून घेऊयात.

Vivo कंपनीने त्यांचा नवीन X200T 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 50-मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये समाविष्ट आहे. या नवीनतम Vivo फोनमध्ये पॉवरफूल बॅटरी, जलद चार्जिंग सपोर्ट आणि एक उत्तम प्रोसेसर आहे. तसेच या फोनला पाच वर्षांचे OS अपडेट्स आणि सात वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देखील मिळणार आहे. चला जाणून घेऊया या फोनची किंमत किती आहे, तसेच हा कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि त्यात कोणते खास फीचर्स असतील.
Vivo X200T 5G ची भारतातील किंमत
या Vivo मोबाईलचा 12GB/256GB व्हेरिएंट 59 हजार 999 रूपयांमध्ये आणि 12GB/512GB व्हेरिएंट 69 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये हा नवीन Vivo फोन Motorola Signature आणि OPPO Reno15 Pro Mini शी जोरदार स्पर्धा करेल. या फोनवर 5 हजार रूपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल आणि तुम्हाला कंपनीकडून 1 वर्षाची मोफत विस्तारित वॉरंटी देखील मिळेल.
Vivo X200T 5G चे स्पेसिफिकेशन्स
ऑपरेटिंग सिस्टम: अँड्रॉइड 16 वर चालणारा हा फोन ओरिजिन ओएस 6 वर काम करेल.
डिस्प्ले: या विवो फोनमध्ये 6.67-इंचाचा AMOLED फुल एचडी प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या विवो फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9400 प्लस चिपसेट वापरण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअप: या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा ZEISS प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आणि 50 मेगापिक्सेलचा सुपर-टेलिफोटो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 6200 mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे जी 40 W वायरलेस आणि 90 W फ्लॅश चार्जला सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटी: सुरक्षेसाठी या फोनमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ व्हर्जन 5.4, 5जी आणि 3डी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
