दमदार बॅटरी पॉवर असलेला विवोचा ‘हा’ फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत, स्पेसिफिकेशन
Vivo ने एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे, या फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 6500mAh पॉवरफुल बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन सारख्या फीचर्स आहेत. चला जाणून घेऊया या फोनची किंमत, विक्री तारीख आणि खास फीचर्स?

विवो कंपनीने त्यांचा मिड-रेंज सेगमेंटमधील ग्राहकांसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह एक नवीन स्मार्टफोन विवो टी४ प्रो लाँच केला आहे. हा फोन 50 मेगापिक्सेल सोनी कॅमेरा सेन्सर, 6500 एमएएच पॉवरफुल बॅटरी, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 12 जीबी पर्यंत रॅम आणि एआय फीचर्सना सपोर्ट करतो. हँडसेटला चार वर्षांसाठी प्रमुख ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स मिळत राहतील. चला तर या नवीन स्मार्टफोनच्या किंमती आणि फिचर्सबद्दल जाणून घेऊयात.
या नवीनतम विवो स्मार्टफोनमध्ये गुगल जेमिनी ॲप प्री-इंस्टॉल केलेले आहे आणि जेमिनी लाईव्ह आणि इतर एआय फिचर्संना सपोर्ट करते. या फोनमध्ये एआय कॅप्शन, एआय स्मार्ट कॉल असिस्टंट आणि एआय स्पॅम कॉल प्रोटेक्शन सारख्या अद्भुत फिचर्सं देण्यात आलेले आहे.
Vivo T4 Pro ची भारतातील किंमत
भारतीय बाजारात या स्मार्टफोनच्या 8 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये, तर 8 जीबी/256 जीबी व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आणि 12 जीबी/2566 जीबीच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन ब्लेझ गोल्ड आणि नायट्रो ब्लू रंगांमध्ये खरेदी करू शकाल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची विक्री 29 ऑगस्टपासून Vivo ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर करण्यात येणार आहे.
या स्मार्टफोनच्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Nothing Phone 3, Honor 200, Realme P3 Ultra 5G, Oppo F29 Pro 5G, iQOO Z10 5G आणि Infinix GT30 Pro 5G Plus सारख्या फोनना कडक स्पर्धा देईल.
बँक ऑफर्स
एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि एसबीआय यासारख्या निवडक बँक कार्डसह या फोनवर 3,000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे. याशिवाय, जुना फोन एक्सचेंज केल्यावर 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय सुविधा उपलब्ध असेल. 1199 रुपयांच्या प्लॅनचा वापर करणाऱ्या जिओ वापरकर्त्यांना या फोनसह दोन महिन्यांसाठी 10 ओटीटी ॲप्सचा मोफत प्रीमियम ॲक्सेस दिला जाईल.
Vivo T4 Pro चे स्पेसिफिकेशन्स
स्क्रीन: फोनमध्ये 6.77 -इंचाचा फुल एचडी प्लस रिझोल्यूशन क्वाड कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 5000 निट्स लोकल पीक ब्राइटनेस आणि 1500 निट्स ग्लोबल पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो.
चिपसेट: या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित फनटच ओएस 15 वर काम करतो.
कॅमेरा: या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 प्रायमरी सेन्सर, 3x झूम सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल बोकेह कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आलेला आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 90 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6500 एमएएच सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे.
