AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp वरील व्हॉईस मेसेज वाचता येणार, नव्या फीचरविषयी जाणून घ्या

Voice Message Transcription: WhatsApp ने व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट नावाचे एक नवीन फीचर आणले आहे. WhatsApp वर व्हॉईस मेसेज आता टेक्स्टमध्ये ट्रान्सक्राइब केले जाऊ शकतात. या नव्या फीचरविषयी जाणून घ्या.

WhatsApp वरील व्हॉईस मेसेज वाचता येणार, नव्या फीचरविषयी जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Nov 25, 2024 | 7:07 PM
Share

Voice Message Transcription: WhatsApp वर आलेल्या व्हॉईस मेसेज ऐकण्याचा कंटाळा आला आहे का? मग त्यावर आता नवीन आलेला पर्यायही जाणून घ्या. आता तुम्हाला पूर्वीसारखं WhatsApp वर आलेला व्हॉईस मेसेज ऐकण्याची गरज नाही. हो सत्य आहे. आता तुम्ही व्हाईस मेसेज वाचूही शकतात. या नव्या फीचरविषयी जाणून घ्या.

WhatsApp च्या नव्या फीचरचे नाव काय?

WhatsApp ने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. WhatsApp च्या नव्या फीचरमुळे व्हॉईस मेसेज वाचणे आणखी सोपे झाले आहे. WhatsApp ने आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून या फीचरची माहिती दिली आहे. कंपनीच्या ब्लॉग पोस्टनुसार याला व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट फीचर असे नाव देण्यात आले आहे.

WhatsApp चे नवे फीचर कुठे उपलब्ध?

WhatsApp चे नवे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे. WhatsApp चे हे नवे फीचर त्या लोकांसाठी खास आहे ज्यांना व्हॉईस मेसेज ओपन करायचे नाहीत. युजर्स WhatsApp च्या या फीचरच्या माध्यमातून येणाऱ्या व्हॉईस मेसेजेसचे ट्रान्सक्रिप्ट वाचू शकतात. हे ट्रान्सक्रिप्ट फक्त व्हॉईस मेसेज रिसिव्ह करणाऱ्या युजर्सना दिसेल. WhatsApp च्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे व्हॉईस मेसेज अजूनही सुरक्षित आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.

नवे फीचर कसे सुरू करावे?

आधी तुम्हाला WhatsApp ओपन करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला WhatsApp सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर चॅटवर टॅप करा. येथे तुम्हाला व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्टवर क्लिक करून ऑन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही युजरच्या चॅटवर जाऊन व्हॉईस मेसेज लाँग प्रेस करा त्यानंतर ट्रान्सक्रिप्टवर टॅप करा आणि व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट होईल.

फीचर कोणत्या भाषांमध्ये उपलब्ध?

हे फीचर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी हे सध्या इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज (ब्राझील), रशियन आणि हिंदीपुरते मर्यादित आहे.

तुम्हाला “ड्राफ्ट” लेबल हे माहिती आहे का, आम्ही याविषयी माहिती तुम्हाला खाली सविस्तर देत आहोत. जाणून घ्या.

चॅटला स्पष्ट “ड्राफ्ट” लेबल

जेव्हा आपण मेसेज टाईप करण्यास सुरवात करता परंतु “सेंड” दाबत नाही, तेव्हा WhatsApp आता चॅटला स्पष्ट “ड्राफ्ट” लेबलसह लावणार आहे. आपल्या चॅट लिस्टच्या वर हा ड्राफ्ट दिसेल. यामुळे अनेक चॅट स्क्रोल न करता तुम्ही तुमचे मेसेज त्वरीत शोधू शकता आणि पूर्ण करू शकता, असे कंपनीने म्हटले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.