AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सअ‍ॅपवर येतोय नवा फीचर, पण यामुळे होऊ शकते चिडचिड; स्टेटसदरम्यान येणार जाहिरातींचा मारा

व्हॉट्सअ‍ॅपने एक नवं फीचर आणलं आहे जे अनेक युजर्सना त्रासदायक ठरू शकतं. चला, जाणून घेऊया काय आहे हे फीचर, जे वापरकर्त्यांच्या अनुभवात मोठा बदल घडवू शकतं.

व्हॉट्सअ‍ॅपवर येतोय नवा फीचर, पण यामुळे होऊ शकते चिडचिड; स्टेटसदरम्यान येणार जाहिरातींचा मारा
whatsapp-new-featureImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jul 29, 2025 | 7:01 PM
Share

व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपवर असे फीचर्स येत आहेत जे तुमच्या युजर अनुभवात बदल घडवतील. आजवर केवळ खासगी मेसेजिंगसाठी ओळखले जाणारे WhatsApp आता जाहिरात प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्याचा अंदाज अनेकांनी आधीच लावला होता, आता त्याचीच अधिकृत सुरुवात होताना दिसतेय.

Meta कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या Android बीटा अपडेट (वर्जन 2.25.21.11) मध्ये दोन नवे फीचर्स आणले आहेत Status Ads आणि Promoted Channels. सध्या हे फीचर्स काही निवडक बीटा युजर्ससाठीच उपलब्ध आहेत, पण लवकरच ते सर्व युजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

काय आहे Status Ads फीचर?

नवीन फीचरनुसार, आता व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘Status’ सेक्शनमध्ये जाहिराती दिसणार आहेत, जशा Instagram Stories मध्ये असतात. या जाहिराती खास करून बिझनेस अकाउंट्सकडून पोस्ट केल्या जातील आणि त्यांना ‘Sponsored’ असं लेबल दिलं जाईल, जेणेकरून वापरकर्त्यांना लगेच समजेल की हा जाहिरातीचा कंटेंट आहे. हे Ads तुमच्या मित्रपरिवाराच्या स्टेटस दरम्यान दिसतील, जे काहींना त्रासदायक वाटू शकतं.

जर एखादा यूजर एखाद्या स्पॉन्सर्ड जाहिरातदाराचा कंटेंट बघायला इच्छुक नसेल, तर तो त्या जाहिरातदाराला ब्लॉक देखील करू शकतो. म्हणजे यूजर्सकडे कंट्रोल असेल की कोणत्या जाहिराती बघायच्या आणि कोणत्या नाही.

Promoted Channels

दुसरं मोठं फीचर म्हणजे Promoted Channels. यामध्ये एखादा ब्रँड किंवा कंटेंट क्रिएटर आपला चॅनेल प्रमोट करू शकतो. असं केल्यास त्यांच्या चॅनेलला WhatsApp च्या ‘Channel Directory’ मध्ये वरची जागा मिळेल. हे देखील ‘Sponsored’ टॅगसह असेल. हा बदल त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे लवकर जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचू इच्छितात.

प्रायव्हसीला धक्का?

मेटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की हे दोन्ही फीचर्स वापरकर्त्याच्या प्रायव्हसीवर परिणाम करणार नाहीत. जाहिराती फक्त ‘Status’ आणि ‘Channels’ या पब्लिक सेक्शनमध्ये दिसतील. वैयक्तिक चॅट्स किंवा ग्रुप्समध्ये कोणतीही जाहिरात दाखवली जाणार नाही. म्हणजेच तुमचे मेसेजिंग अनुभव जाहिरातींपासून मुक्त राहतील, असं कंपनीने सांगितलंय.

याशिवाय, Meta एक नवीन फीचर टेस्ट करत आहे ज्यात युजर्सना त्यांचा Ad Activity Report डाउनलोड करता येईल. यात दाखवलं जाईल की कोणत्या जाहिराती कधी आणि कुणाकडून दाखवण्यात आल्या. यामुळे जाहिरात व्यवस्थापन अधिक पारदर्शक होईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर जाहिराती दाखवण्याची चर्चा 2019 पासून सुरु होती. पण यावर कंपनीने काही वेळ गप्प राहिल्यानंतर, आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करत आहे. हे अपडेट स्पष्ट करतं की WhatsApp आता फक्त मेसेजिंग अ‍ॅप राहिलेलं नाही, तर Meta साठी मोठा जाहिरात माध्यम बनत चाललंय जिथून कंपन्या आणि क्रिएटर्स दोघेही कमाई करू शकतील.

थोडक्यात सांगायचं झालं, तर…

WhatsApp आता तुमच्या स्टेटस दरम्यान जाहिराती आणत आहे आणि ब्रँड्सना चॅनेल प्रमोट करण्याची मुभा देत आहे. जरी हे बदल काही युजर्ससाठी त्रासदायक ठरू शकतात, तरीही Meta ने याची काळजी घेतली आहे की प्रायव्हसीला बाधा पोहोचणार नाही. मात्र यामुळे WhatsApp च्या ‘क्लीन आणि अ‍ॅड-फ्री’ इमेजला काही प्रमाणात तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.