AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp Update | व्हॉट्सॲप प्रेमींसाठी मोठी अपडेट! एकाच फोनमध्ये वापरा दोन अकाऊंट

WhatsApp Update | व्हॉट्सॲपने कमाल फीचर आणले आहे. या नवीन फीचरची चर्चा यापूर्वी पण झाली होती. व्हॉट्सॲप सातत्याने नवनवीन फीचर आणते आणि त्यावर युझर्स फिदा होतात. आता हे केवळ चॅटिंग ॲप न राहाता, बहुपयोगी ॲप ठरले आहे. आता व्हॉट्सॲपमध्ये हे खास अपडेट आले आहे.

WhatsApp Update | व्हॉट्सॲप प्रेमींसाठी मोठी अपडेट! एकाच फोनमध्ये वापरा दोन अकाऊंट
| Updated on: Feb 24, 2024 | 3:52 PM
Share

नवी दिल्ली | 24 February 2024 : व्हॉट्सॲपमध्ये अनेक नवीन फीचर्स आले आहेत. या नवनवीन फीचर्सची सातत्याने चर्चा होते. आता आणखी नवीन फीचर युझर्सच्या भेटीला आले आहे. व्हॉट्सॲप मल्टिपल अकाऊंटचे फीचर घेऊन येत आहे. सध्या बीटा युझर्ससाठी त्याची चाचपणी सुरु आहे. लवकरच सर्वसामान्य युझर्ससाठी त्याचा वापर करण्यात येणार आहे. व्हॉट्सअप एका स्टेट्स अपडेट आधारे त्याची माहिती देणार आहे. युझर्स आता एकाच फोनमध्ये दोन वेगवेगळे अकाऊंट चालवू शकतो. चला तर जाणून घ्या, कशी आहे प्रक्रिया, पण त्यापूर्वी तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करुन घ्या.

व्हॉट्सॲप अपडेट केल्यानंतर तुम्हाला काही प्रक्रिया करावी लागेल. जर तुम्हाला फोनमध्ये दोन व्हॉट्सॲप वापरण्याची सुविधेचा पर्याय दिसत नसेल तर मग तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागेल. तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲपमध्ये अजून ते अपडेट कंपनीने केलेले नसेल. त्यामुळे व्हॉट्सॲप अपडेट करत राहा.

ही प्रक्रिय करा फॉलो

  1. स्टेप 1: सर्वात अगोदर फोनमधील व्हॉट्सॲप अकाऊंट उघडा
  2. स्टेप 2: फोनच्या सर्वात उजव्या स्क्रीनवरील 3 डॉटच्या आयकॉनवर क्लिक करा
  3. स्टेप 3: त्यानंतर सर्वात खाली दिसत असलेल्या Settings या पर्यायावर क्लिक करा
  4. स्टेप 4: आता सर्वात अगोदर Account या पर्यायावर क्लिक करा
  5. स्टेप 5: पुढील पर्यायावर Add Account वर क्लिक करा
  6. स्टेप 6: यानंतर पहिल्या क्रमांकावर तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अकाऊंट दिसेल. तर दुसऱ्या क्रमांकावर + साईनसह Add account चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
  7. स्टेप 7: आता Agree and Continue या पर्यायावर क्लिक करा
  8. स्टेप 8: आता तुमचा दुसरा क्रमांक नोंदवा. त्यावर तुमचे व्हॉट्सअप खाते सक्रिय करता येईल. त्यानंतर Next वर क्लिक करा
  9. स्टेप 9: आता एक ओटीपी येईल. हा ओटीपी नोंदविल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये दुसरे व्हॉट्सॲप पण सक्रिय होईल.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमच्या दोन व्हॉट्सॲप खात्यापैकी कोणत्याही एका खात्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ते वापरता येईल. हे त्या प्रमाणे करेल, जसे एका फोनमध्ये दोन वा त्यापेक्षा अधिक फेसबूकचा, इन्स्टाग्रामचा वापर होतो.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.