फोनची बॅटरी संपली किंवा इंटरनेट नसलं तरी चालणार WhatsApp, जाणून घ्या नव्या अपडेटबाबत

व्हॉट्सअ‍ॅप बद्दल आता लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना माहिती आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून झटपट मेसेज पाठवणं सोपं होतं. आतापर्यंत अनेक बदल कंपनीने केले आहेत. आता त्यात एका नव्या फीचर्सची भर पडणार आहे.

फोनची बॅटरी संपली किंवा इंटरनेट नसलं तरी चालणार WhatsApp, जाणून घ्या नव्या अपडेटबाबत
WhatsApp चं जबरदस्त अपडेट, आता मोबाईल स्विच ऑफ किंवा नेट पॅक संपला तरी चालणार
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 3:37 PM

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. गेल्या काही वर्षात व्हॉट्सअ‍ॅपनं कात टाकत अनेक बदल केले आहेत. युजर्सच्या सुखसोयी लक्षात घेऊन कंपनी काही ना काही अपडेट करत असते.आता असंच एक फीचर कंपनीने युजर्ससाठी आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप विना इंटरनेटही वापरता येणार आहे. मोबाईल स्विच ऑफ झाला तरी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज पाठवता येणार आहे. ही सुविधी डेस्कटॉप व्हॉट्सअ‍ॅपसाठी असणार आहे. कंपनीने स्वत: ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.

डेस्कटॉप व्हॉट्सअ‍ॅपवरून युजर्स आता ऑडिओ आणि ग्रुप व्हिडीओ कॉलही करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “चार्जर नसलं तरी चिंता करू नका. आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप चार डिव्हाईससोबत लिंक करू शकता. फोन स्विच ऑफ जरी झाला तरी चॅट इंक्रिप्टेड, सिंक्ड चालू राहील.”

“तुमचा मोबाईल व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉपला कनेक्ट व्हावा यासाठी आम्ही विंडोजसाठी नवं अ‍ॅप तयार केलं आहे.हे अ‍ॅप पटकन लोड होईल . त्याचा इंटरफेसपण ओळखीचा असल्याने चॅटिंग करताना अडचण येणार नाही.”, असंही पुढे नमूद केलं आहे.

WhatsApp Text Detection Feature

दुसरीकडे, व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फीचरमध्ये युजर्स फोटोवर लिहिलेले टेक्स्ट रिमुव्ह करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. टेक्स्ट कॉपी करायचं असेल तर एक ऑप्शन दिलं आहे. एका ऑप्शनवर क्लिक करताच फोटोवरील टेक्स्ट गायब होईल आणि ते टेक्स्ट कॉपी देखील करू शकता. पण हे फीचर View Once मोडवर सेंड केलेल्या फोटोला सपोर्ट करत नाही. म्हणजेच फोटोवरून टेक्स्ट कॉपी करता येणार नाही.हे फीचर आयओएस वर्जन आणि बीटा वर्जन सुरु केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतंच आपल्या ग्रुप साईजमध्ये मोठा बदल केला आहे. आता ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स अ‍ॅड करण्याची सुविधा असणार आहे. कोणाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करायचं आणि नाही, याचा संपूर्ण अधिकार ग्रुप अ‍ॅडमिनला असणार आहे. त्याचबरोबर ग्रुपमधील मेसेज डिलीट करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी अ‍ॅडमिनकडे असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स

व्हॉट्सअ‍ॅप हे 100 हून अधिक देशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजिंग अ‍ॅप आहे. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे 2.24 बिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर 2016 ते 2020 या कालावधीत 1 बिलियन युजर्स जॉईन झाले. 100 बिलियन मेसेज दिवसाला फॉरवर्ड आणि रिसिव्ह केले जातात. जगभराच्या आकडेवारीनुसार भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक युजर्स आहेत. भारतात 487.5 मिलियन व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.