AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp का Down होतं? कंपनीकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणते ‘ती’ 45 मिनिटं आमच्यासाठी दीर्घकाळ

व्हॉट्सअ‍ॅप द्वारे व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग ग्रुप चॅट या सर्व सुविधा बंद झाल्या होत्या. 45 मिनिटानंतर त्या सुरळीत झाल्या.

WhatsApp का Down होतं? कंपनीकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण, म्हणते 'ती' 45 मिनिटं आमच्यासाठी दीर्घकाळ
| Updated on: Mar 20, 2021 | 10:40 AM
Share

मुंबई : Whatsapp डाऊन झालं आणि कधी नाही ते लोकांना अख्खं जगच ठप्प झाल्यासारखं वाटलं. पण काहींना बरं झालं, तेवढा काळ का होईना आता सुखाचा झाला, सुटका झाली म्हणून आनंदही व्यक्त केला. पण व्हॉटसअॅप का बंद होतं? या प्रश्नाचं उत्तर कंपनीने दिलेलं नाही पण पहिल्यांदाच स्पष्टीकरण मात्र दिलं आहे. (why whatsapp was down, explanation from the company, Those 45 minutes long for us)

काय म्हणणं आहे कंपनीचं?

भारतासह बहुतांश देशात काल रात्री म्हणजेची शुक्रवारी 11 च्या सुमारास Whatsapp अचानक बंद झालं. ना कुठेल मेसेज जात होते ना येत होते. व्हिडीओ कॉलिंगही बंद. लोकांनी मोबाईल चालू बंद करुन बघितले पण काहीच उपयोग नाही. शेवटी Whatsapp डाऊन झाल्याचं अधिकृतपणे कळवलं गेलं. मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा व्हॉटसअॅप सुरु झालं. त्यावर कंपनीनं ट्विटरवर पहिल्यांदाच अधिकृतपणे वक्तव्य जारी केलं आहे, त्यात कंपनी म्हणते, तुमची जी असुविधा झाली त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी ती 45 मिनिटं खूप मोठा काळ होता, तुम्ही धैर्य ठेवलंत त्याबद्दल धन्यवाद. पण आता आम्ही परत आलो आहोत.

इन्स्टाग्राम, फेसबुक मेसेंजरही डाऊन

त्या 45 मिनिटांसाठी फक्त Whatsapp बंद होतं असं नाही तर फेसबूकचं मेसेंजरही बंद होतं आणि इन्स्टाग्रामचंही. म्हणजे SMS ची सवय मोडल्यानंतर फुकटात हे अॅप वापरायची सवय लागलेल्यांना अचानकच जगाशी संपर्क तुटल्याची भावना निर्माण झाली. बराच काळ नेमकं काय घडलं आहे हेच कळंत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत लोकांमध्ये संभ्रम होता. पण Whatsapp, इन्स्टा, फेसबुकवर लोकांचे व्यवसायही अवलंबून आहेत त्यामुळे त्या 45 मिनिटात अनेकांचं मोठं आर्थिक नुकसानही झालेलं आहे.

जेव्हा सिग्नलनं चुटकी घेतली

Whatsapp बंद पडताच Signal या अॅपने स्पर्धकाची चुटकी घेण्याची संधी सोडली नाही. Whatsapp बंद पडताच लोकांना पर्याय म्हणून Signal कडे मोर्चा वळवला. त्यांच्या युजर्समध्ये अचानक वाढ झाली. तसा मेसेजच Signal ने केला. सिग्नलच्या युजर्समध्ये मोठी वाढ होते आहे. सर्वांचं ह्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. Whatsapp ची सेवा पुर्ववत करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांच्याबाबत सहवेदना. कदाचित टेकच्या जगाबाहेरच्या लोकांना हे कधीच कळणार नाही की, वीकेंड डाऊनटाईम काय असतो.

संबंधित बातम्या

whatsapp down | जगभरात व्हॉट्सअ‌ॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर डाऊन; 45 मिनिटानंतर सेवा पूर्ववत

मोदी सरकारचा WhatsApp च्या New Privacy Policy ला विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात ‘ही’ मागणी

(why whatsapp was down, explanation from the company, Those 45 minutes long for us)

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.