World Cup 2023 | बॅट आणि बॉलच नाही, हे तंत्रज्ञान पण दिमतीला, विश्वचषकाचा आनंद लूटा

World Cup 2023 | यंदाच्या विश्वचषकात भारतीय टीमची जोरदार चर्चा रंगली. त्यासोबतच या तंत्रज्ञानाकडे पण क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले. या तंत्रज्ञानानंतर टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप वा इतर कोणत्याही डिजिटल स्क्रीनवर सामना पाहण्याचा अनुभव समृद्ध करणारा ठरला. या सामन्याचा आनंद लुटता आला. कोणते आहे हे तंत्रज्ञान...

World Cup 2023 | बॅट आणि बॉलच नाही, हे तंत्रज्ञान पण दिमतीला, विश्वचषकाचा आनंद लूटा
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 3:10 PM

नवी दिल्ली | 19 नोव्हेंबर 2023 : भारत आणि क्रिकेट प्रेमींसाठी आजचा दिवस सर्वात खास आहे. 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना सुरु झाला आहे. भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले आहे. त्यामुळे अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर काही काळ चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा सामना अनेक जण टीव्हीवरच नाही तर मोबाईल, लॅपटॉप वा इतर कोणत्याही डिजिटल स्क्रीनवर पाहत असतील. स्टेडियमवरील घाडमोड त्यांना पाहता येते. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासोबतच प्रेक्षकांचा सळसळता उत्साह बाहेरील चाहत्यांना अनुभवता येतो. ते या सर्व घडामोडींचे साक्षीदार होतात. पण काही खास तंत्रज्ञानाच्या मदतीने चाहत्यांना हा सामना याची देहि, याची डोळा अनुभवता येतो. कोणते आहे हे खास तंत्रज्ञान…

  1. स्मार्ट बॉल टेक्नॉलॉजी – क्रिकेट विश्वचषक 2023 मधील सामन्यात स्मार्ट बॉल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येतो. यामुळे चेंडूची गती आणि त्याची फिरकी, तो किती स्विंग होत याची माहिती मिळते. यामुळे टीमला आणखी चांगली कामगिरी बजावता येते. हे तंत्रज्ञान 2019/2020 मध्ये पहिल्यांदा आले.
  2. स्पीड गनचा वापर – स्मार्ट बॉल तंत्रज्ञानाशिवाय स्पीड गन्सचा वापर करण्यात येतो. हे प्रगत तंत्रज्ञान गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूची गती मोजते. स्क्रीनवरील स्कोअर पट्टीवर याविषयीच्या नोंदी दिसून येतात.
  3. AR आणि VR तंत्रज्ञान – चाहत्यांचा सहभाग वाढविण्यासाठी एआर आणि व्हीआर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. व्हर्च्युअल रिएलिटी आणि ऑग्युमेंटेडे रिएलिटी याचा वापर करण्यात येतो. यामध्ये प्रिव्ह्यू, रिव्ह्यू, फलंदाज आणि गोलंदाज यांची एक्शन तंत्रज्ञानाआधारे विश्लेषण करण्यात येते.
  4. Snicko -Snickometer – ही एक खास प्रणाली आहे. त्याचा मोठा फायदा क्रिकेट जगतात होतो. मायक्रोफोनमधून येणारा आवाज हे डिव्हाईस रेकॉर्ड करते. त्यामुळे थर्ड अंपायरला निकाल, निर्णय देताना मोठी मदत मिळते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. स्पाईडर कॅम अथवा बर्ड आय व्ह्यू – टीव्ही, मोबाईल, टॅब, लॅपटॉप आणि इतर डिव्हाईसवर सामना विविध कोनातून अनुभवता यावा यसाठी स्पाईडर कॅमेऱ्याची मदत होते. बर्ड आय व्ह्यू चा पण वापर होतो.
  7. एलईडी स्टम्प आणि बेल्स – चेंडूने अथवा यष्टीरक्षक हातच लावताच LED Stumps आणि Bails मधील लाईट लागलीच लागतो. या एलईडी स्टम्प आणि बेल्सची किंमत 40,000 ते 50,000 अमेरिकन डॉलर यांच्या दरम्यान असते. भारतीय चलनात त्याची किंमत जवळपास 32-41 लाखांदरम्यान आहे.
Non Stop LIVE Update
ताम्हिणी घाटातील ट्रॅफीक जाम होऊनही धबधब्यासाठी पर्यटक जमले
ताम्हिणी घाटातील ट्रॅफीक जाम होऊनही धबधब्यासाठी पर्यटक जमले.
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान
केंद्राच्या कांदा निर्यातबंदीने यंदा झाले तब्बल आठ लाख मे. टनचे नुकसान.
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी.
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी.
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली...
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली....
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली...
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली....
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे.
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे.
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे.
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल.