अनेक ढासू फीचर्स तरी किंमत अवघी 6999, ‘या’ स्मार्टफोनची जगभरात रेकॉर्डब्रेक विक्री

शाओमीने (Xiaomi) एक नवीन विक्रम नोंदवला आहे. कंपनीचा एक स्मार्टफोन जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन ठरला आहे.

अनेक ढासू फीचर्स तरी किंमत अवघी 6999, 'या' स्मार्टफोनची जगभरात रेकॉर्डब्रेक विक्री
Redmi-9A
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 9:23 PM

मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) एक नवीन विक्रम नोंदवला आहे. या कंपनीचा एक स्मार्टफोन जगभरात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन ठरला आहे. काउंटरपॉईंट रिसर्च ग्लोबल हँडसेट मॉडेल ट्रॅकरच्या मते, शाओमीचा रेडमी 9 ए (Redmi 9A) स्मार्टफोन 2021 च्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे. (Xiaomi Redmi 9A smartphone become highest selling mobile in 2021 first quarter)

हा स्मार्टफोन व्हॉल्यूमच्या बाबतीत अव्वल स्थानी राहिला आहे, तर सॅमसंग गॅलेक्सी एस 21 अल्ट्रा 5 जी (Galaxy S21 Ultra 5G) या स्मार्टफोनने कमाईच्या बाबतीत विक्रम नोंदविला आहे आणि अव्वल स्थानावर आहे. शाओमी रेडमी 9 ए स्मार्टफोन गेल्या वर्षी ‘देश का स्मार्टफोन’ या टॅगलाइनअंतर्गत भारतात सादर करण्यात आला होता.

Redmi 9A स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री चीन आणि भारतात झाली तर Redmi 9 ने दक्षिण आशियाई बाजारात चांगली कामगिरी केली आहे. काउंटरपॉईंट रिसर्चमध्ये असे म्हटले आहे की, Redmi 9, Redmi 9A आणि Redmi Note 9 च्या जबरदस्त विक्रीमुळे शाओमी कंपनी ग्लोबली $150 च्या प्राइस बँडमध्ये अव्वल ठरली आहे आणि कंपनीने या सेगमेंटमध्ये 19 टक्के वाटा मिळविला आहे.

Xiaomi Redmi 9A चे फिचर्स आणि किंमत

भारतात शाओमीचा Redmi 9A हा स्मार्टफोन सप्टेंबर 2020 मध्ये लाँच करण्यात आला. तेव्हा या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 7 हजार 499 रुपये इतकी आहे.

हा मोबाईल MediaTek Helio G25 octa-core प्रोसेसरवर आधारित आहे. या मोबाईलमध्ये 6.53 इंचांचा HD+ TFT-IPS डिस्प्ले आहे. या मोबाईलची बॅटरी 5000mAh इतकी आहे. विशेष म्हणजे फास्ट चार्जिंग हे या मोबाईलचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या स्मार्टफोनला 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे तर याचा रियर कॅमेरा 13 मेगापिक्सलचा इतका आहे.

Redmi 9 Power चे फिचर्स आणि किंमत

रेडमी 9 पॉवर च्या 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजवाल्या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये इतकी आहे. तर 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. स्मार्टफोन ब्लेजिंग ब्लू, इलेक्ट्रिक ग्रीन, फेयरी रेड आणि मायटी ब्लॅक कलर मध्ये मिळणार आहे. हा फोन अॅमेझॉन आणि Mi.com वर ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच एमआय होम्स स्टूडियोज आणि मी स्टोर्सवर ऑफलाइन उपलब्ध आहे आहे.

ड्यूल सिम सपोर्टेड रेडमी 9 पॉवर हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI 12 वर चालतो. फोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप स्क्रीन दिली आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेश्यो 19.5:9 इतका आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 3 देण्यात आला आहे. यामध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

इतर बातम्या

15 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, जाणून घ्या टॉप 5 स्मार्टफोन्सचे फीचर्स

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 6GB रॅमसह दमदार फोन बाजारात, किंमत 10,000 रुपयांहून कमी

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…

(Xiaomi Redmi 9A smartphone become highest selling mobile in 2021 first quarter)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.