Xiaomi कडून भारतात नवीन MIUI 13 रोलआऊट, जाणून घ्या कोणकोणते स्मार्टफोन्स अपडेट होणार?

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या अँड्रॉयड (Android) स्किन MIUI 13 चं लेटेस्ट व्हर्जन भारतात लॉन्च केलं आहे. नवीन शाओमी सॉफ्टवेअर लाइव्ह वॉलपेपर, नवीन साइडबार मेनू, चांगले RAM ऑप्टिमायझेशन, उत्तम बॅटरी ऑप्टिमायझेशन टूल्स यांसारख्या अनेक नवीन फीचर्ससह येते.

Xiaomi कडून भारतात नवीन MIUI 13 रोलआऊट, जाणून घ्या कोणकोणते स्मार्टफोन्स अपडेट होणार?
Xiaomi rolls out MIUI 13
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 12:28 PM

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या अँड्रॉयड (Android) स्किन MIUI 13 चं लेटेस्ट व्हर्जन भारतात लॉन्च केलं आहे. नवीन शाओमी सॉफ्टवेअर लाइव्ह वॉलपेपर, नवीन साइडबार मेनू, चांगले RAM ऑप्टिमायझेशन, उत्तम बॅटरी ऑप्टिमायझेशन टूल्स यांसारख्या अनेक नवीन फीचर्ससह येते. Xiaomi ने MIUI 13 रोलआउटसाठी आपला रोडमॅप देखील तयार केला आहे, ज्यामध्ये कंपनीने सांगितले आहे की, भारतातील त्यांच्या 10 स्मार्टफोन्सना Q1 2022 मध्ये लेटेस्ट MIUI 13 अपडेट मिळेल. चला तर मग MIUI सह Xiaomi स्मार्टफोन्समध्ये येणाऱ्या सर्व लेटेस्ट फीचर्सवर (Latest Features) एक नजर टाकूया…

MIUI 13 सह, Xiaomi स्मार्टफोन्सना नवीन ऑप्टिमाइझ्ड फाइल स्टोरेज सिस्टीम मिळेल जी तुमच्या Xiaomi स्मार्टफोनमध्ये स्टोअर केलेल्या फाइल्स 3 वर्षांनंतरही रीड (वाचन) आणि एडिटचा वेग वाढवेल. याला कंपनीने ‘लिक्विड स्टोरेज’ असे नाव दिले आहे. MIUI 13 मधील नवीन RAM ऑप्टिमायझेशनला कंपनीने “Atomized Memory” म्हटले आहे. Xiaomi स्मार्टफोन्सवरील बॅकग्राउंड प्रोसेस एफिशिएन्सी 40 टक्क्यांपर्यंत वाढवेल. याशिवाय, एक नवीन स्मार्ट बॅलन्स फीचर आहे जे Xiaomi स्मार्टफोनची बॅटरी 10 टक्क्यांपर्यंत वाढवेल.

नवीन विजेट्स आणि साइड बार मेनू

MIUI 13 Xiaomi स्मार्टफोनमध्ये नवीन विजेट्स तसेच सेटिंग्ज आणि टूल्समध्ये क्विक अॅक्सेससाठी नवीन साइडबार देखील मिळेल. नवीन विजेट्ससह, Xiaomi युजर्स त्यांचे स्मार्टफोन त्यांच्या गरजेनुसार आणि वापरानुसार अधिक पर्सनलाइज करु शकतील. MIUI 13 वेगवेगळ्या साइजच्या विजेट सपोर्टसह येते, ज्यामध्ये 2×1, 2×2, 2×3, 4×2 आणि 4×4 साईज ऑप्शन्सचा समावेश आहे.

नवीन साईडबार मेनू आणि वॉलपेपर

दुसरीकडे, साइडबार हे आणखी एक कार्यक्षम साधन आहे जे Xiaomi स्मार्टफोन वापरकर्त्यांना त्यांचे सर्व आवडते अॅप्स आणि टूल्स फ्लोटिंग विंडोमध्ये फक्त एका स्वाइपसह ऍक्सेस करण्यास अनुमती देईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे Xiaomi डिव्हाईसवरील मल्टीटास्किंग वाढेल / वापरकर्ते साइडबारवर एका वेळी 10 अॅप्स ठेवू शकतात. कंपनीने MIUI 13 वर नवीन लाइव्ह वॉलपेपर जोडण्यासाठी व्हिज्युअल कंटेंट फर्म ब्युटी ऑफ सायन्ससोबत भागीदारी केली आहे.

या MI, रेड्मी फोन्समध्ये मिळणार अपडेट

Xiaomi ने उघड केले आहे की MIUI 13 2022 च्या पहिल्या तिमाहीपासून Xiaomi 11T Pro, Xiaomi 11 Lite NE 5G, Mi 11X Pro, Mi 11 Lite या डिव्हाईसेसमध्ये उपलब्ध होईल. या यादीमध्ये Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 आणि Redmi 10 Prime सारख्या Redmi स्मार्टफोनचा देखील समावेश आहे, यामध्येदेखील त्याच कालावधीत अपडेट मिळत राहतील. त्यानंतर इतर स्मार्टफोन्समध्ये अपडेट मिळेल.

इतर बातम्या

सावधान | ऑनलाईन बँकिंग करत असाल तर जरा इकडे लक्ष द्या, आणि आधी तुमचं बँक अकाऊंट चेक करा…

7700 mAh बॅटरी, मोठा डिस्प्ले, Motorola Moto Tab G70 बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

Free Fire Redeem Codes : ऑनलाईन गेमिंगमधून शानदार रिवॉर्ड्स, कसा करावा क्लेम?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.