AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला आता कॉलबाबत मिळतंय नवी सुविधा, जाणून घ्या काय आणि संपूर्ण प्रक्रिया

व्हॉट्सअ‍ॅप आता जवळपास सर्वजण वापरतात. स्मार्टफोन आणि हे अॅप नसेल असं शक्यच नाही. व्हॉट्सअ‍ॅपमुळे बऱ्याच गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण कधी कधी काही गोष्टी आपल्या हातून राहून जातात. खासकरून वेळेवर कॉल करणं विसरून जातो. पण यावरही व्हॉट्सअ‍ॅपने तोडगा काढला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला आता कॉलबाबत मिळतंय नवी सुविधा, जाणून घ्या काय आणि संपूर्ण प्रक्रिया
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 3:30 PM
Share

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरात वापरलं जाणारं सर्वात लोकप्रिय अ‍ॅप आहे. या माध्यमातून कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि ऑफिसच्या सहकाऱ्यांशी संवाद साधणं बरं पडतं. या माध्यमातून फोटो, फाईल, टेक्स्ट मेसेज, कॉल आणि व्हिडीओ कॉल केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या गरजेनुसार बदल केले आहेत. पूर्वीपेक्षा व्हॉट्सअ‍ॅप हे अधिक हायटेक झालं आहे. असं असताना व्हॉट्सअ‍ॅपवर आणखी एक चांगला फिचर आलं आहे. या माध्यमातून तुम्ही कॉल्स शेड्यूल करू शकता. म्हणजेच तुम्ही तुमचे महत्त्वाचे कॉल्स, मेसेज वेळेत करू शकता. त्यामुळे कोणताही ठरलेला कार्यक्रम तुमच्याकडून सुटणार नाही. तुम्हाला यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर जाऊन फक्त एक छोटीशी प्रोसेस फॉलो करावी लागेल. तसं करताच तु्म्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून कॉल शेड्यूल करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची मदत घेण्याची गरज भासणार नाही. तसेच वर्च्युअल मीटिंग सेट करण्याची गरज भासणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप कॉल शेड्यूल कसं अ‍ॅक्टिव्ह कराला जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅप कॉल शेड्यूल करण्यासाठी फोनमध्ये सर्वात आधी अ‍ॅप ओपन करा. यानंतर ज्या ग्रुपवर जिथे कॉल शेड्यूल करायचा आहे. ग्रुपमध्ये गेल्यानंतर मेसेज बारच्या खाली लेफ्ट साईडला एक प्लस चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा. तर राईट साईडला फोटो, कॅमेरा, लोकेशनसह इतर ऑप्शन दिसतील. यापैकी इव्हेंट आयकॉनवर क्लिक करा. आता इव्हेंट क्रिएट करा आणि त्यासाठी इव्हेंटचं नाव लिहून टाईम सेट करा. जर मिटिंग लिंकच्या माध्यमातून सुरू करायची असेल तर टॉगल ऑन करा. या माध्यमातून तुम्ही व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलपैकी एक सिलेक्ट करू शकता. यानंतर शेवटी सेंड ऑप्शनवर क्लिक करा.

शेड्युल कॉल रद्दही करता येतो, कसं ते जाणून घ्या

कॉल्स शेड्युल केल्यानंतर तुम्हाला काही कारणास्तव जर मीटिंग रद्द करायची वेळ आली तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही मीटिंग आरामात रद्द करू शकता. फक्त चॅटमध्ये जाऊन मीटिंग शेड्युलमध्ये एडिट इव्हेंटवर क्लिक करा. यानंतर कॅन्सलवर क्लिक करा.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट तुम्ही लॉक करू शकता

चॅट लॉक करण्याची प्रोसेसही सोपी आहे. कोणतं चॅट लॉक करायचं त्या चॅटवर जा . यानंतर प्रोफाईल ऑप्शनवर क्लिक करा आणि चॅट लॉकच्या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर Lock this chat with fingerprint किंवा Lock this chat with face id यापैकी एक सिलेक्ट करा.

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....