लाखमोलाचं पान! 24 कॅरेट गोल्ड पान कधी खाल्लंय का? Viral झालाय ‘हा’ भन्नाट Video
Food video : सोशल मीडियावर (Social media) खाद्यपदार्थांचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल (Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात पानटपरीचालक तब्बल एक लाखाचं पान (Pan) तयार करून देतोय. काय आहे काय या लाखाच्या पानामध्ये?

Food video : सोशल मीडियावर (Social media) खाद्यपदार्थांचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल (Viral) होत असतात. कारण यूझर्सना ते अधिक आवडतात. आपण कधीकधी हॉटेलात जेवण करतो. त्यानंतर शेजारी असलेल्या पानटपरीवरून उपलब्ध असलेल्या विविध फ्लेवरमधून आपल्या आवडीच्या फ्लेवरचं पान (Pan) घेत असतो. हे पान केवळ टेस्टीच नसतं तर त्यात काही गोष्टी अशा टाकलेल्या असतात, की ज्या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. हे पानटपरीचालक आपल्याला विविध ऑफर्सही कधी कधी देत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात पानटपरीचालक तब्बल एक लाखाचं पान तयार करून देतोय. काय आहे काय या लाखाच्या पानामध्ये? हा व्हिडिओ खूप व्हायरल झालाय. कारण पान हा एकतर सर्वांचाच आवडीचा विषय आणि त्यात एक लाखाचं पान म्हणजे काहीतरी भन्नाटच असणार.
भरभरून टाकतो साहित्य
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पानटपरीचालक एक लाखाचं पान बनवत असल्याबद्दल सांगतोय. मग तो पानावर विविध वस्तू टाकतो. पाइनअॅपल, शतावरी, आवळा, गुलकंद, कच्चा आंबा, चॉकलेट, चांदी, इलायची, तांबे, सोने आणि बरंच काय काय हा पानवाला त्यात टाकतो. लाखाचं पानं म्हणजे भरभरून दिलेलं असणार, यात शंकाच नाही. पान लाखाचं असो वा नसो, आवडतं तर सर्वांनाच. त्यामुळे हा व्हिडिओही अनेकांना आवडलाय.
यूट्यूबवर अपलोड
यूट्यूबवर आर यू हंग्री (ARE YOU HUNGRY) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 27 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 4.6 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होतेय. ‘1 LAKH ₹ का 24 C GOLD PAAN देख के हैरान रहे जाओगे’ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. तुम्हीही ट्राय करा, हे पान. (Video courtesy – ARE YOU HUNGRY)
