22 वर्षांच्या तरूणीने 18 कोटीत विकलं कौमार्य, ऑनलाइन लिलावात प्रसिद्ध व्यक्तींकडून बोली
ब्रिटनमधील एका 22 वर्षांच्या विद्यार्थिनीने तिचे कौमार्य (Virginity) विकल्याचे वृत्त आहे. एका हॉलिवूड अभिनेत्याने 18 कोटी रुपयांना त्या मुलीची व्हर्जिनिटी विकत घेतल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. पुष्टी करण्यासाठी त्या मुलीची मेडिकल टेस्टही करून घेण्यात आली होती. या तरुणीने तिच्या कौमार्याचा ऑनलाइन लिलाव केला होता. अनेक राजकारणी, उद्योगपती आणि अभिनेते यांचाही या बोलीत समावेश होता.

हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. .यूके, मॅन्चेस्टरमध्ये राहणाऱ्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थिनीने, लॉरा हिने चक्क तिचे कौमार्य (Virginity) विकण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. ऑनलाइन लीलावाच्या ( ऑक्शन) माध्यमातून तिने कौमार्य विकण्याचा सल्ल घेतला होता. तब्बल 18 कोटी रुपये ( 1.7 मिलियन पाऊंड) मध्ये तिने तिचे कौमार्य विकलं असून एका हॉलिवूड अभिनेत्याने हे पैसे मोजल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून जगभरात सध्या तिचीच चर्चा सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, एका एस्कॉर्ट एजन्सीच्या वेबसाइटवर हा लिलाव आयोजित करण्यात आला होता आणि त्यात राजकारणी, व्यावसायिक आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींनी बोली लावली होती. अखेर, एका हॉलिवूड स्टारने सर्वाधिक बोली लावली आणि तो जिंकला.
मला माझ्या निर्णयाबाबत कोणताही पश्चाताप नसल्याचे लॉराने नमूद केलं. उलट याद्वारे मी माझं भविष्य सुरक्षित करू शकते, हा एक स्मार्ट उपाय आहे, असं तिचं म्हणणं आहे. मला काहीच पश्चाताप नाही. अनेक मुली, तरूणी काही ना काही कारणामुळे आपलं कौमार्य गमावतात, मला कमीत कमी आर्थिक सुरक्षितता तरी मिळाली, असे तिने सांगितलं. आपल्याला करिअरची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हे पैसे वापरायचे आहेत असे लॉराने सांगितलं असून तिने स्वतःसाठी “शुगर डॅडी” शोधण्यात स्वारस्य देखील दाखवले आहे.
कौमार्याच्या पुष्टीसाठी मेडिकल टेस्टही केली
व्हर्जिनिटी विकण्यासाठी लॉराने एका एस्कॉर्ट एजन्सीसोबत संपर्क साधला आणि कौमार्य विकण्याबाबत आपला निर्णय तिने त्यांना कळवला. व्हर्जिनिटी विकत घेण्यासाठी कोणी खरेदीदार असतील तर कळवा, असे तिने संबंधित एजन्सीला सांगितलं होतं. लॉराच्या या निर्णयानंतर खरेदीदारांची एकच रांग लागली. अखेरीस लिलाव करुन तिच्या कौमार्याची विक्री करण्यात आली. त्यामध्ये जगभरातील अनेक राजकारणी, दुबईतीव व्यावसायिक, अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश होता, त्यांनीही बोली लावली होती. अखेर, एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने 1.7 दशलक्ष पौंड्स म्हणजेच 18 कोटी रुपये एवढी बोली लावून लॉराचं कौमार्य विकत घेतलं.
लॉराने सांगितले की, हॉलीवूड सेलिब्रिटीसोबत करार निश्चित करण्यापूर्वी तिला आघाडीच्या उद्योगपती आणि राजकारण्यांकडून ऑफर मिळाल्या होत्या. करारावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी, लॉराने खरेदीदाराला तिच्या कौमार्यत्वाची पुष्टी देण्यासाठी मेडिकल टेस्टही केली. दोन्ही पक्षांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवण्यात आली होती.
लॉराच्या निर्णयामुळे इंटरनेटवर खळबळ, सोशल मीडियावर वाद
लॉराच्या या निर्णयामुळे मोठी चर्चा रंगली आहे. काही लोक मानतात की कौमार्य विकणे चुकीचे आहे, तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार, ही तिची वैयक्तिक निवड आहे. संस्कृती आणि शुद्धतेचा हवाला देत अनेकजण या निर्णयावर टीका करत आहेत. पण जर हा निर्णय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल तर असे करणे चुकीचे नाही, असं काहींचं म्हणणं आहे. याबाबत सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.