सगळेच लटलटले! अचानक कोपऱ्यातून येतो आणि फणा काढून उभा राहतो… मुलींच्या शाळेत सापांचा कहर; 15 दिवसांत निघाले इतके कोब्रा
एका शाळेत गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने कोब्रा साप आढळत आहेत. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या 1100 मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यध्यापकांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील देवरी परिसरातून एक भयानक बातमी समोर आली आहे. येथील शासकीय कन्या हायर सेकेंडरी स्कूलमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने साप आढळण्याच्या घटना घडत आहेत. विशेषतः कोब्रा सारख्या विषारी सापांच्या उपस्थितीमुळे शाळेत शिकणाऱ्या 1100 मुली आणि शाळेचे कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर मुख्यध्यापकांनीही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
शाळा व्यवस्थापनाचा मोठा निर्णय
दररोज मुली शाळेत येतात. पण त्यांना सतत भीती वाटते की कोणत्या तरी कोपऱ्यातून साप निघेल. परिस्थिती इतकी भयावह झाली आहे की शाळा व्यवस्थापनाने पाच वर्गखोल्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. या खोल्यांमध्ये कोणत्याही मुलीला जाण्याची परवानगी नाही. फक्त काही कर्मचारीच आत जाऊन परिस्थितीची पाहणी करतात.
वाचा: ‘या’ तीन राशींचे वाईट दिवस संपणार, शुक्र गोचर आणणार आनंदाचे दिवस
या खोल्यांमधील फरशी खणून त्यांची दुरुस्ती केली जात आहे, जेणेकरून साप कुठून येत आहेत हे समजेल आणि त्यांचा मार्ग बंद करता येईल. शाळा व्यवस्थापन दर दुसऱ्या दिवशी ‘सर्प मित्रांना’ बोलावत आहे, जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही.
शाळा परिसरात आणि आसपास कीटकनाशकांची फवारणी
कोब्रासारख्या धोकादायक सापांच्या सातत्याने उपस्थितीमुळे संपूर्ण शाळा चिंतेत आहे. मुली आता वर्गखोलीऐवजी ओट्यावर बसून अभ्यास करत आहेत. ही तात्पुरती व्यवस्था पाऊस आणि उष्णतेमुळे अत्यंत त्रासदायक ठरत आहे. शाळेच्या परिसरातील आणि आसपासची झुडपं कापली गेली असून कीटकनाशकांची फवारणी केली गेली आहे. तरीही साप येणे थांबलेले नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
