AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 17 महिन्यात 3 कोटींचं कर्ज फेडलं, महिलेनं सांगितली पैसे बचतीची ‘आयडियाची कल्पना’!

द सन यूकेच्या अहवालानुसार, अमेरिकेचे शैनन आणि तिचे पती दोघेही त्यांचे कर्ज फेडण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी त्यांनी आपल्या खर्चात मोठी कपात केली. कर्जाची परतफेड करण्यासाठी, जोडप्याने फर्निचरपासून आपल्या जेवणापर्यंत काटकसर करण्यास सुरवात केली.

अवघ्या 17 महिन्यात 3 कोटींचं कर्ज फेडलं, महिलेनं सांगितली पैसे बचतीची 'आयडियाची कल्पना'!
अवघ्या 17 महिन्यात 3 कोटींचं कर्ज फेडलं, महिलेनं सांगितली पैसे बचतीची 'आयडियाची कल्पना'!
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 6:11 PM
Share

नवी दिल्ली : आजच्या काळात प्रत्येकावर कोणते ना कर्ज नक्की असते. कुणावर व्यावसायिक कर्ज, कुणावर वाहन कर्ज, कुणावर गृहकर्ज असो पण कर्ज नसलेला व्यक्ती दुर्मिळच असेल. कर्जाचे हफ्ते आणि महागाई यामुळे पैसे वाचवणे हे एक कठीण काम आहे. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याने आपल्या जीवनशैलीमध्ये काही खास बदल करून कर्ज कसे कमी केले याचा खुलासा केला आहे. (3 crore loan repaid in just 17 months, woman says idea)

द सन यूकेच्या अहवालानुसार, अमेरिकेचे शैनन आणि तिचे पती दोघेही त्यांचे कर्ज फेडण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी त्यांनी आपल्या खर्चात मोठी कपात केली. कर्जाची परतफेड करण्यासाठी, जोडप्याने फर्निचरपासून आपल्या जेवणापर्यंत काटकसर करण्यास सुरवात केली.

शैननच्या कुटुंबात पाच लोक आहेत, जे शक्य तितक्या लवकर कर्ज फेडण्यासाठी त्यांचे बजेट कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांचे टिकटॉक अकाउंटवर त्याचे व्हिडिओ अपलोड करतात, जे लोकांना खूप आवडतात. सध्या हे जोडपे 4 कोटी 66 लाख रुपयांवरून 1 कोटी 32 लाख रुपयांचे कर्ज आणण्यात यशस्वी झाले आहे. त्याने हे काम अवघ्या 17 महिन्यांत केले आहे.

बचतीबाबत व्हिडिओमध्ये केला खुलासा

शैननने व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे की, आमचे किराणा बजेट प्रत्येक आठवड्यात 7,327 रुपयांच्या आत ठेवण्याची आमची योजना आहे. शिवाय कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक्ससारख्या वस्तू खरेदी करण्यापूर्वी आम्ही नेहमीच मोठ्या विक्री (ऑफर) ची वाट पाहतो. तसेच इतर अनेक अर्थसंकल्पीय तंत्रांचा अवलंब करून कर्ज कमी करण्यात या जोडप्याला यश आले.

जीवनशैलीत बदल लागू करण्यासाठी सुमारे सात महिने लागले

जोडप्याने केलेल्या पहिल्या मोठ्या बदलामध्ये, त्यांनी 3000 चौरस फुटांऐवजी 1000 चौरस फुटाचे घर भाड्याने घेतले, ज्यामुळे कुटुंबाची दरमहा एकूण 86,405 रुपयांची बचत झाली. एवढेच नाही तर या कुटुंबाने त्यांच्या ‘नवीन’ कार विकल्या आणि जुन्या कार खरेदी केल्या. यामुळे त्याने एका महिन्यात 57 हजारांहून अधिक बचत केली. तसेच रात्रीच्या जेवणासाठी बाहेर न जाता त्यांनी हजारो रुपयांची बचत केली. अशा प्रकारे जीवनशैलीत बदल लागू करण्यासाठी सुमारे सात महिने लागल्याचा शैननचा दावा आहे.

दोन वर्षांत तीन-चतुर्थांशाने कमी केले कर्ज

अशाप्रकारे केवळ दोन वर्षांत कुटुंबाने तिचे कर्ज तीन-चतुर्थांशाने कमी केले आहे. आता ते त्यांच्या टिप्स इतरांसोबत ऑनलाईन शेअर करतात, जेणेकरून त्यांना कर्ज फेडण्याच्या किंवा बचतीच्या टिप्स मिळू शकतील. शैनन एक चार्ट बनवून तिच्या खर्चाचा तपशील तयार करते, ज्यामध्ये वीज बिल, पाणी बिल, भाज्या, खरेदी ते मोबाईल रिचार्ज यांचा हिशोब असतो. (3 crore loan repaid in just 17 months, woman says idea)

इतर बातम्या

‘बार्टी’च्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडणार नाही, बडोलेंच्या टीकेनंतर धनंजय मुंडेंचा दावा

देशातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अध्यक्षांची बैठक प्रथमच औरंगाबादेत होणार, काय आहे बैठकीचा अजेंडा?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.