ऐकावं ते नवलच! 49 वर्षांच्या महिलेचं 5 वर्षांच्या मांजरीसोबत लग्न, कुणाचं ‘शुभ’ कुणी व्हायचं सावधान?

viral news : 49 वर्षीय महिलेने नुकतंच लग्नगाठ बांधली. तिने तिच्या पाळीव मांजरीलाच आपलं जीवनसाथी बनवलंय. मोगी असं या मांजरीचं नाव आहे.

ऐकावं ते नवलच! 49 वर्षांच्या महिलेचं 5 वर्षांच्या मांजरीसोबत लग्न, कुणाचं 'शुभ' कुणी व्हायचं सावधान?
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 12:27 PM

मुंबई : सध्या कधी कुणावर प्रेमवर (Love) होईल, कोण कुणाशी लग्न करेल याचा अंदाज बांधता येत नाही. जात, धर्म, वय, लिंग असा कुठलाही भेद न मानता लोक प्रेम करतात. नागराज मंजुळे (Nagraj Manjule) म्हणतात तसं, सध्या प्रेम हा एक विद्रोह आहे. त्यामुळे सगळे भेद सगळ्या विषमता विसरून लोक प्रेम करत आहेत. अशीच एका अजब लग्नाची गजब गोष्ट सध्या समोर आली आहे. एका 49 वर्षांच्या महिलेने 5 वर्षांच्या मांजरीसोबत लग्न केलंय. यावर तुमचा विश्वास बसणं कठीण आहे पण तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. कारण ही घटना खरी आहे.

49 वर्षांच्या महिलेचं 5 वर्षांच्या मांजरीसोबत लग्न

‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार या 49 वर्षीय महिलेने नुकतंच लग्नगाठ बांधली. तिने तिच्या पाळीव मांजरीलाच आपलं जीवनसाथी बनवलंय. मोगी असं या मांजरीचं नाव आहे. सिडकपच्या डेबोरा या महिलेने या लग्न समारंभात एक स्मार्ट टक्सिडो परिधान केला होता.तर मोगीसाठीही तिने खास खरेदी केली होती. या विशेष दिवसासाठी तिने आपल्या लागक्या मोगीला बो टाय आणि कॅप घातली होती. त्यांनी लग्नाचे सर्व विधी पूर्ण करत आपल्या सहजीवनाला सुरूवात केली.

डेबोराने या लग्नाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. डेबोरा म्हणाली, “माझ्याकडे गमावण्यासारखं काही नव्हतं पण मिळवण्यासाठीमात्र खूपकाही होतं. म्हणून मी माझ्या मांजरीशी लग्न केलं. माझं आधीच ठरलं होतं, मला माझ्या मांजरीपासून कधीही वेगळं व्हायचं नव्हतं. कारण मी तिच्यावर खूप प्रेम करते. मी मोगीशिवाय राहू शकत नाही, ती खरोखरच खूप गोड आहे. त्यामुळे मी तिच्या सोबत लग्न केलंय. आम्ही आमच्या पुढच्या आयुष्याला सुरूवात करतोय. तुमच्या शुभेच्छा सोबत असू द्या”

दक्षिण-पूर्व लंडनमधील एका उद्यानात या महिलेला आढळून आली. तिने तिला घरी आणलं. तिची काळजी घेतली. दोघींची मैत्री बहरत गेली आता या दोघींनी लग्नगाठ बांधली आहे. पण असं एकाद्या महिलेने मांजरीशी लग्नगाठ बांधणं अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारं आहे.त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यामुळे कुणाचं ‘शुभ’ कुणी व्हायचं सावधान? असा सवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.