AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बैलांचं ‘गँगवॉर’ सुरू असताना अचानक येतो कुत्रा, पाहा पुढे काय होतं? Video viral

Animal video : सोशल मीडियावर (Social media) विविध प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत असून त्यात प्राण्यांशी संबंधित व्हिडिओंचाही समावेश आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, यात बैलांमध्ये 'गँगवॉर' पाहायला मिळत आहे.

बैलांचं 'गँगवॉर' सुरू असताना अचानक येतो कुत्रा, पाहा पुढे काय होतं? Video viral
दोन बैलांच्या झुंजीत येतो कुत्राImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2022 | 10:41 AM
Share

Animal video : सोशल मीडियावर (Social media) विविध प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) होत असून त्यात प्राण्यांशी संबंधित व्हिडिओंचाही समावेश आहे. यातील काही व्हिडिओंमध्ये प्राणी मजेशीर कृत्य करताना दिसत आहेत, तर काहींमध्ये त्यांच्यात जोरदार भांडणही होत असतात. जंगली प्राण्यांच्या भांडणात अनेकवेळा हे प्राणी गंभीर जखमी झाल्याचेही पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, मात्र हा व्हिडिओ जंगली प्राण्यांचा नाही तर बैलांचा आहे. यात बैलांमध्ये ‘गँगवॉर’ पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दोन बैल आपापसात भांडताना दिसत आहेत. तेव्हाच एक कुत्राही या लढ्यात सामील होतो. त्यानंतर जे बघायला मिळते ते तुम्ही कदाचित क्वचितच पाहिले असेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हसालही…

दोन बैलांत आला कुत्रा

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका कच्च्या रस्त्याच्या कडेला अचानक दोन बैल एकमेकांना भिडतात आणि जोरदार एकमेकांना टक्कर मारतात. यादरम्यान घोड्यावर बसलेली एक व्यक्ती ही लढाई पाहत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की बैल एकमेकांवर कसे तुटून पडत आहेत, पण अचानक एक कुत्रा भांडणात सामील होतो. एक बैल अतिशय चिडून जातो आणि तो कुत्र्याचा कान तोंडाने पकडून त्याला मारतो. दरम्यान, दुसऱ्या बैलाला संधी मिळून तो पांढऱ्या बैलाला शिंगाने मारतो. अशी मजेशीर झुंज तुम्ही क्वचितच पाहिली असेल, ज्यात बैलांमध्ये कुत्रा लढायला आला असेल.

इन्स्टाग्रामवर शेअर

बैलांचा हा ‘गँगवॉर’ व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ir_geographic नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 25 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, की लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा :

‘विठु माऊली तू…’ ‘या’ मुलाचा आवाज एकदा ऐकाच, पूर्ण Video पाहिल्याशिवाय राहणार नाहीत

Viral video : छेड काढणाऱ्याला मुलीनं दाखवला हिसका; Social media users म्हणतायत, बहुत सही किया

Instagram block केलं म्हणून ढसाढसा रडली..! लोक म्हणाले, हिला देशापेक्षा अॅपची जास्त चिंता; Video viral

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.