AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याची 2 किमी लांबीची सापडली मोठी खाण; रात्रीतून या देशाचे नागरिक श्रीमंत

तर या देशातील नागरिकांचं भाग्य रात्रीतूनच चमकलं. या देशात सोन्याचा खजिना सापडला आहे. या देशात 2 किमी लांबीची सोन्याची खाण सापडली आहे. हा छोटासा देश यामुळे मालामाल झाला आहे.

सोन्याची 2 किमी लांबीची सापडली मोठी खाण; रात्रीतून या देशाचे नागरिक श्रीमंत
रात्रीतून या देशातील नागरीक श्रीमंत
| Updated on: Sep 12, 2025 | 2:09 PM
Share

Found huge gold : तर या देशातील नागरिकांचं भाग्य रात्रीतूनच चमकलं. या देशात सोन्याचा खजिना सापडला आहे. या देशात 1.3 मैल लांबीची सोन्याची खाण सापडली आहे. हा छोटासा देश यामुळे मालामाल झाला आहे. ही घटना युरोपच्या श्रीमंतीत भर घालणारी आहे. हा भाग युरोपमधील सुप्रसिद्ध गोल्ड लाईन बेल्टचा एक भाग आहे. येथे अनेक दुसरे महागडे खनिजं दडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उत्तरी स्वीडनमधील आयडा क्षेत्रात शास्त्रज्ञांना ही खाण सापडली. ही युरोपसाठी मोठी बातमी असल्याचे सांगितले जाते. या घटनेने या बेल्टमध्ये अजून मोठी खनिज संपदा हाती लागण्याची शक्यता पण वाढली आहे.

कुठे मिळाला सोनेरी खजिना ?

हे नवीन संशोधन स्वीडन देशातील उत्तर भागात झाले. आयडा (Aida) नावाचे एक ठिकाण आहे. हे स्टॉकहोमपासून जवळपास 630 किलोमीटर उत्तरमधील ठिकाण आहे. येथून पहिली आणि जुनी सोन्याची खाण ही 4 किलोमीटर दूर आहे. त्याच्याजवळच सोन्याची ही नवीन खाण पाहायला मिळाली. या नवीन सोनेरी युगामुळे स्वीडनचे नागरीक रातोरात श्रीमंत झाले. देशाच्या खजिन्यात यामुळे मोठी भर पडणार आहे.

हा भाग पूर्वीपासूनच खनिज उत्खननासाठी उपयुक्त मानण्यात येतो. पण 2025 मध्ये नवीन साईटची परवानगी मिळाली. तिथे उत्खनन सुरू झाले. तेव्हाच येथे जमिनीखाली काही तरी गवसणार असे संकेत मिळू लागले. अत्याधुनित तंत्रज्ञानामुळे या परिसरात जमिनीखाली मोठा खजिना दडल्याचे समोर आले. या परिसरात जमिनीखाली सोने असेल याची शक्यता इतक्या दिवस कुणालाच वाटली नाही. पण जेव्हा अत्याधुनिक यंत्राचा वापर करण्यात आला. त्यानंतर खोदकामात मोठा खजिना हाती लागला.

आतापर्यंत काय हाती लागले

आतापर्यंत या संशोधनातून किती सोने हाती लागले याचा अंदाज अजूनही वर्तवण्यात आलेला नाही. पण शास्त्रज्ञानुसार हे संशोधन उत्साह वाढवणारे आहे. या भागात अजूनही संशोधनाला मोठा वाव आहे.

  • 70.5 फूट खोल थरात १.९४ ग्रॅम/टन सोन्याचा शोध
  • 15.1 फूट खोल थरामधये 5.45 ग्रॅम/टन सोने गवसले
  • 57.4 फूट खोल तिसऱ्या थरात 1.17 ग्रॅम/टन सोने हुडकले

या क्षेत्रात सोन्याच्या आणि इतर खनिजांच्या संशोधनाला खूप वाव आहे. हा परिसर 2 किलोमीटर लांबीचा आहे. त्यात अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आणि सोन्याचे थर आढळले. 14 ड्रिलिंग पॉईंट्समध्ये 12 ठिकाणी सोन्याचे स्पष्ट संकेत मिळाले. तर 5 ठिकाणी थेट सोन्याचा जाड थर समोर आला. या घडामोडींमुळे देशाची तिजोरी अजून भरणार आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.