Video : “तेरे पास मेरा दिल है, मेरे प्यार की निशाणी”, रानू मंडलनंतर ट्रक ड्रायव्हरचा गाण्याचा व्हीडिओ व्हायरल

viral video : सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक ट्रक ड्रायव्हर मोहम्मद रफी यांचं एक गाणं गाताना दिसत आहे.

Video : तेरे पास मेरा दिल है, मेरे प्यार की निशाणी, रानू मंडलनंतर ट्रक ड्रायव्हरचा गाण्याचा व्हीडिओ व्हायरल
व्हायरल व्हीडिओ
आयेशा सय्यद

|

Apr 27, 2022 | 1:15 PM

मुंबई : सोशल मीडिया… सर्व सामान्यांचा ‘मीडिया’  (Social media) यावर तुम्ही तुम्हाला हवी ती गोष्ट पोस्ट करू शकता आणि ती गोष्ट क्षणार्धात सगळ्यांची होऊ जाते. या माध्यमाला तरूणाईचं माध्यम म्हणूनही संबोधलं जातं कारण या माध्यामाने तरूणाईला त्यांची ओळख दिली आहे. यामुळे अनेकाना लोकप्रियता मिळवून दिली. सर्वसामान्यांना स्टार केलं. यातलंच एक नाव म्हणजे रानू मंडल (Ranu Mandal). तिने एक गाणं गायलं अन् ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. आताही असाच एक व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यात एक ट्रक ड्रायव्हर मोहम्मद रफी यांचं गाणं गाताना दिसत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक ट्रक ड्रायव्हर मोहम्मद रफी यांचं एक गाणं गाताना दिसत आहे. हे गाणं अनेकांच्या पसंतीला उतरतोय. विवेक वर्मा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला ” या कलाकृतीला तुम्हीच तुम्हीच कॅप्शन सुचवा”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Vivek Verma (@vvekverma)

पुढे विवेक वर्मा यांनी लिहिलंय की,”कमलेश काका आयुष्यभर ट्रक ड्रायव्हर राहिले आहेत, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते संगीतकार मोहम्मद रफी यांचे चाहते आहेत. त्यांनी ‘मुझे इश्क़ है’ हे गाणं गायलंय. काही प्रसंगात हरवलेल्या त्यांच्या गायकीतला आत्मा मला जाणवला! मी फक्त एक प्रयोग म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की तो गाणे गाण्याचे स्वप्न कसे पूर्ण करतो आहे. तुम्हाला त्याचे ऐकणे आवडले असेल तर काही चांगल्या कमेंट शेअर करा. मी उद्या त्यांना भेटेन आणि जर सर्व काही ठीक झाले तर मी त्याला गाणे डब करण्यासाठी संगीत स्टुडिओत घेऊन जाण्यास तयार आहे. स्टुडिओत गाण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं, तर मला आनंद होईल. मनापासून चांगलं काम तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आवडल्यास कमेंट मध्ये सांगा.”

ट्रक ड्रायव्हर कमलेश यांचा आवज अनेकांच्या मनाला भिडला आहे. अनेकांनी कमेंट करत याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्याला कमलेश यांची गायकी आवडल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

दरम्यान रानू मंडलचं एक गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. 2019 मध्ये ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं तिने गायलं. तिच्या या गाण्याला खूप जास्त पसंती मिळाली. नंतर तिला गाण्याच्या ऑफरही मिळाल्या तिच्या गाण्याचे व्हीडीओ आताही व्हायरल होत असतात.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें