AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐ रंगली… रात्रीच्या पार्ट्यांना जाऊ नकोस, रेप होऊ शकतो! नाक्यानाक्यावर लागले अजब पोस्टर्स; काय आहे भानगड?

वाहतूक पोलिसांच्या सुरक्षा मोहिमेच्या पोस्टर्सवरून वाद निर्माण झाला आहे. या पोस्टर्समध्ये महिलांना बलात्कार टाळण्यासाठी घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले होते, ज्यावर विरोधकांनी टीका केली होती. एका स्वयंसेवी संस्थेने परवानगीशिवाय हे पोस्टर्स लावले होते आणि नंतर ते काढून टाकण्यात आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ऐ रंगली... रात्रीच्या पार्ट्यांना जाऊ नकोस, रेप होऊ शकतो! नाक्यानाक्यावर लागले अजब पोस्टर्स; काय आहे भानगड?
PostersImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 02, 2025 | 5:36 PM
Share

गुजरातमधील अहमदाबाद येथे ट्रॅफिक पोलिसांच्या सुरक्षा अभियानाच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये महिलांना बलात्कारापासून वाचण्यासाठी घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शहरातील काही भागांमध्ये लावलेल्या या पोस्टरवर विरोधकांनी तीव्र टीका केली असून, राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. आता हे पोस्टर नेमके काय आहेत? चला जाणून घेऊया…

पोस्टरवर काय लिहिले आहे?

शहरात लावलेल्या या पोस्टरवर लिहिले आहे की, “रात्री उशिरापर्यंत पार्ट्यांना जाऊ नका, तुमच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार होऊ शकतो. तुमच्या मित्रासोबत अंधाऱ्या, सुनसान भागात जाऊ नका, जर तुमच्यावर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झाला तर काय होईल?” मात्र, आता ही पोस्टर्स काढून टाकण्यात आली आहेत.

वाचा: सोलापूरमधील नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

पोलिसांचे स्पष्टीकरण

पोलिस उपायुक्त (यातायात पश्चिम) नीता देसाई यांनी स्पष्ट केले की, शहरातील पोलिसांनी रस्ता सुरक्षेशी संबंधित पोस्टर प्रायोजित केले होते, महिला सुरक्षेशी संबंधित नाही. त्यांनी दावा केला की, सतर्कता ग्रुप नावाच्या एका एनजीओने ट्रॅफिक पोलिसांच्या परवानगीशिवाय ही वादग्रस्त पोस्टर लावली होती.

नीता देसाई म्हणाल्या, “या एनजीओने आमच्याशी संपर्क साधला आणि सांगितले की, ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जागरूकता कार्यक्रम आयोजित करू इच्छितात. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यात सहभागी व्हावे. त्यांनी आम्हाला जागरूकतेशी संबंधित पोस्टर दाखवली, पण अशी वादग्रस्त पोस्टर दाखवली नाहीत आणि परवानगीशिवाय ती लावली. ही बाब लक्षात येताच ही पोस्टर तात्काळ काढून टाकण्यात आली.”

आम आदमी पक्षाने भाजपवर साधला निशाणा

या प्रकरणावरून राजकारणही तापले आहे. आम आदमी पक्षाच्या गुजरात शाखेने भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले की, या पोस्टरमुळे राज्यातील महिला सुरक्षेची वास्तविक परिस्थिती उघड झाली आहे. पक्षाने म्हटले, “गुजरातमधील भाजप सरकार महिला सशक्तीकरणाची गप्पा मारते, पण प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. गेल्या तीन वर्षांत गुजरातमध्ये 6,500 हून अधिक बलात्काराच्या आणि 36 हून अधिक सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या, म्हणजेच दररोज पाचपेक्षा जास्त बलात्काराच्या घटना घडत आहेत.”

आपने पुढे म्हटले, “मुख्यमंत्री आणि भाजप नेते महिला सुरक्षेची भाषा करतात, पण अहमदाबादसारख्या मोठ्या शहरात ही पोस्टर गुजरातची वास्तविकता दाखवत आहेत. आमचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की, गुजरातमधील महिलांनी रात्री घराबाहेर पडावे की नाही?”

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.