AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy International Women’s Day 2022: पुरुषाच्या शरीरात फक्त दाखवण्यापुरती ताकत

Happy International Women’s Day 2022: माझ्या दृष्टीने स्त्री हे देवाने बनवलेलं एक वेगळं रसायन आहे. तिच्यात अपार ऊर्जा, शक्ती भरलेली आहे. त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. पुरुषाच्या शरीरात फक्त दाखवण्यापुरती ताकत असते.

Happy International Women’s Day 2022: पुरुषाच्या शरीरात फक्त दाखवण्यापुरती ताकत
| Updated on: Mar 08, 2022 | 9:42 AM
Share

जागतिक महिला दिन (​World Women’s Day) हा दिवस आतापर्यंत मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना, महिला सहकाऱ्यांना शुभेच्छा देण्याइतपतच साजरा केला आहे. त्या व्यतिरिक्त माझ्यासाठी हा इतर सामान्य दिवसांसारखाच एक दिवस. मी कधी या दिवसाबद्दल फार असा वेगळा विचार केला नव्हता. पण आज पहिल्यांदाच या दिवसाबद्दल लिहितोय. काल ऑफिसच्या कॉन्फरन्स रुममध्ये महिला दिनासाठी स्पेशल स्टोरी (Special Story) काय देणार? यावर चर्चा झाली. या दिवसाचे पैलू कसे वेगळ्या पद्धतीने मांडायचे, यावर विचार झाला. नेहमी पेक्षा हटके काय करायचं? हा मुद्दा होता. अखेर शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, संघर्ष कथांपेक्षा स्वत:चा अनुभव (Own experience) आपल्या शब्दात मांडायचं ठरलं. जागतिक महिला दिनचं नाही, तर एक पुरुष म्हणून एकंदर महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन ही यामागची कल्पना आहे.

इतकी ऊर्जा येते कुठून?

बऱ्याचदा रस्त्यावरुन चालताना, ट्रेन किंवा बस पकडण्यासाठी पळणारी महिला बघितली की, मला तिचं मनोमन कौतुक वाटतं. माझ्या मनामध्ये पहिला प्रश्न येतो की, या महिलांमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून? ऑफिसला जाण्यासाठी घर सोडण्याआधी मुलांचे, नवऱ्याचे डबे बनवायचे. सर्व घर आवरायचं. त्यानंतर वेळेत ऑफिसला पोहोचण्याची धडपड. तिथे गेल्यानंतर ऑफिसच्या जबाबदाऱ्या संभाळायच्या. संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा तीच सगळी कामं. दुसऱ्यादिवशीचाही तोच दिनक्रम ठरलेला. या सगळ्यामध्ये एक व्यक्ती म्हणून त्या स्त्रीला स्वत:ची हौस पुरवण्याचा, स्वत:च्या आवडी-निवडी जपण्यासाठी असा वेगळा वेळ कुठे मिळतो? तरीही या महिला कुटुंबाचा नवरा, मुलं यांचा विचार करुन आनंदाने हे सर्व करत असतात.

स्त्री हे देवाने बनवलेलं एक वेगळं रसायन

माझ्या दृष्टीने स्त्री हे देवाने बनवलेलं एक वेगळं रसायन आहे. तिच्यात अपार ऊर्जा, शक्ती भरलेली आहे. त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. पुरुषाच्या शरीरात फक्त दाखवण्यापुरती ताकत असते. कुठल्याही पुरुषाला एखाद्या स्त्री सारखं, दिवसभर नाही किमान दोन तास काम करुन दाखवायला सांगा. त्याला नाही जमणार. ऑफिसमध्ये दिवसाचे आठ तास काम करुन आल्यानंतर आपण आज खूप काम केलय, असं अनेक पुरुषांना वाटतं. ते घरातल्या बेडवर पाय पसरुन मोबाइलवर OTT पाहण्याचा आनंद घेण्यात रमून जातात. तेच घरातल्या स्त्रीने उद्या असा विचार केला तर? आज मी ऑफिसमध्ये खूप काम केलय. आज मी घरकाम नाही करणार. विचार करा, काय चित्र असेल, त्या घरात.

दिवसाची सुरुवातच ‘आई’ या दोन शब्दांनी

स्वत:बद्दल सांगायचं झाल्यास, माझ्या आयुष्यात आई आणि पत्नी ही दोन वेगळी व्यक्तीमत्व आहेत. दोघींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. पण कुटुंबासाठी दोघींची धडपड, संघर्ष आणि त्यागही तितकाच मोठा आहे. माझ्या दिवसाची सुरुवातच ‘आई’ या दोन शब्दांनी होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व वस्तू वेळच्यावेळी माझ्या हातात पडतील, याची काळजी आई घेते. त्यामुळे मला माझं आयुष्य बिनधास्तपणे जगता येतं. घरचा विचार डोक्यात नसतो. खरंतर समजायला लागल्यापासून ते आतापर्यंत आईमुळेच अनेक गोष्टी सोप्या झाल्यात. एखादा दिवस आई आजारी पडल्यानंतर, आई नसेल, तर आयुष्यात किती अडचणी येऊ शकतात ते लक्षात येतं. आई आणि मुलाचं नातं असं असतं की आपण अनेक गोष्टींमध्ये आईला गृहित धरतो. मी सुद्धा याला अपवाद नाही.

इंटरनॅशनल मेन्स डे का साजरा होत नाही?

आज जागतिक महिला दिन आहे. हा दिवस जितक्या मोठ्याप्रमाणात साजरा होतो. तसा इंटरनॅशनल मेन्स डे का साजरा होत नाही? अशी अनेक पुरुषांची तक्रार असते. पण मूळात तक्रार करणाऱ्यांनी एक गोष्ट इथे समजून घेतली पाहिजे की, बाईपण निभावणं इतकं सोप नाहीय. मुलगी, बहिण, पत्नी, आई अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून जाताना एका स्त्रीला बऱ्याच अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. प्रसंगी स्वत:च्या आवडी-निवडीचा, हौस-मौज याचा त्याग करावा लागतो. त्याशिवाय तिच्या आयुष्यावर पुरुषी मानसिकतेतून अधिकार गाजवला जातो, ते वेगळा. हे सर्व पचवून ती स्त्री एक घर उभारते. हे सोपं नाहीय. त्यामुळे माझ्या दृष्टीने फक्त आजचाच नाही, तर 365 दिवस त्या स्त्री शक्तीला सलाम. ‘Happy Women’s Day To All Beautiful Ladies’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.