B.Com Idliwala: नोकरी नाही मिळाली म्हणून बाइकवरच लावला इडली सांबारचा स्टॉल, बी कॉम इडलीवाल्याची प्रेरणादायक कहाणी

संकटांशी दोन हात करणारे कायमच इतिहास रचतात. परिस्थितीसमोर हार न मानता या पट्ठ्याने पदवीदार असूनही इडली सांबारचा स्टॉल लावला आहे.

B.Com Idliwala: नोकरी नाही मिळाली म्हणून बाइकवरच लावला इडली सांबारचा स्टॉल, बी कॉम इडलीवाल्याची प्रेरणादायक कहाणी
बी कॉम इडलीवाला Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 9:43 PM

फरिदाबाद,  संकटाची दरड कोसळली की अनेकांची हिंमत खचू लागते, पण संकटांवर मात करून पुढे जाणे यालाच जीवन ऐसे नाव आहे. सोशल मीडियावर अशा अनेक लोकांच्या प्रेरणादायी कहाण्या आहेत, जे कितीही संकटं आली तरी त्याचा फक्त सामनाच करीत नाही तर त्यावर मात देखील करतात. अशीच एक कथा आहे फरिदाबादच्या (Faridabad) रस्त्यांवर मोटारसायकलवरून इडली-सांबार (Bcom Idliwala) विकणाऱ्या अविनाशची. त्याची प्रेरणादायी कथा जाणून घेतल्यानंतर अनेकांनी अविनाशच्या कामाचे कौतुक केले आहे. कदाचित म्हणूनच असे म्हणतात की जे प्रयत्न करतात ते हरत नाहीत.

मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये केले आहे अविनाशने काम

अविनाशची स्टोरी swagsedoctorofficial या इंस्टाग्राम हँडलने शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये सांगितले की, फरिदाबादमध्ये रस्त्याच्या कडेला स्वादिष्ट इडली-सांबार विकणाऱ्या अविनाशला भेटा. त्याचे शिक्षण झाले आहे आणि त्याने अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये टीम मेंबर म्हणून काम केले आहे. त्यांनी मॅकडोनाल्डमध्येही नोकरी केली आहे. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो मोठ्या मेहनतीने इडली विकतो. त्याच्याकडची इडली खूप स्वादिष्ट असल्याचीही तो म्हणाला.

काय आहे अविनाशची कहाणी?

अविनाशने व्हिडिओमध्ये सांगितले की त्याने 2019 मध्ये बीकॉम पूर्ण केले होते, त्यानंतर त्याने 3 वर्षे मॅकडोनाल्डमध्ये काम केले. तिथूनच त्याला फूड बिझनेसची कल्पना सुचली. पण मोटारसायकलवरून इडली-सांबार विकायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. गेल्या 3 महिन्यांपासून त्याच्याकडे कोणतीही नोकरी किंवा जास्त पैसे नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याने दुचाकीवर इडली-सांबार विकण्यास सुरुवात केली आहे.

एकट्यावर आहे कुटुंबाची जबाबदारी

ज्या मोटारसायकलवर तो स्टॉल लावतो ती मोटरसायकल त्याच्या वडिलांनी त्याला बारावी उत्तीर्ण झाल्यावर दिली होती,  गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी अविनाशवर पडली. तो पुढे सांगतो की त्याची पत्नी दक्षिण भारतीय आहे आणि चांगले दक्षिण भारतीय म्हणजेच साऊथ इंडियन पदार्थ बनवते. त्यामुळे त्याने इडली-सांबार विकायला सुरुवात केली. त्यांना दीड वर्षाचा मुलगा असल्याचेही त्यांनी सांगितले. अविनाशसोबत त्याची आई आणि लहान भावंडेही राहतात.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.