AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

95 वर्षीय अघोरी बाबा अचानक कुंभमेळ्यात प्रकटले, धक्कादायक भविष्यवाणी करून सर्वांनाच फोडला घाम

बाबा कालपुरुष, 95 वर्षीय आघोरी साधू, यांनी प्रयागराज कुंभमेळ्यात भयानक भविष्यवाणी केली आहे. ते गंगेनदीच्या बदलांबद्दल, पृथ्वीच्या बदलत्या श्वासाबद्दल आणि कुंभमेळ्याच्या स्थलांतरांबद्दल बोलतात. कावळ्यांच्या वर्तनावरून आणि नद्यांच्या हालचालीवरून त्यांचे भविष्य कथन अचूक असल्याचे म्हटले जाते.

95 वर्षीय अघोरी बाबा अचानक कुंभमेळ्यात प्रकटले, धक्कादायक भविष्यवाणी करून सर्वांनाच फोडला घाम
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 17, 2025 | 4:10 PM
Share

बाबा कालपुरुष संध्याकाळ होताच आपल्या पायावर पाय ठेवून बैठक मारून बसतात. चिता भडकत असती आणि हवा काळीशार होते. प्रयारागराज महाकुंभच्या मैदानात राखेने माखलेल्या बाबांचं रौद्ररुप पाहून सर्वांनाच धसका बसतो. त्यांच्या हातात मानवी खोपडी असते. ती केवळ दाखवण्यासाठी नसते तर त्यांचं पाणी पिण्याचं ते पात्र असतं. अनेक दशकांपासून त्यांच्या सोबत आहेत. हिमालयात ध्यान धारणा केल्याने त्यांचा आवाज भारदस्त झालेला आहे. आपल्या खर्जातील आवाजातच ते म्हणतात, मनुष्य जे विसरलाय ते सर्व नदी लक्षात ठेवते. जेव्हा गंगा रडेल, तेव्हा तिचे अश्रू मैदानात येतील. त्याची सुरुवात झाली आहे.

त्यांचं वय 95 वर्ष आहे. बाबा कालपुरुष म्हणून ते प्रसिद्ध आहे. कुंभला आलेले ते सर्वात ज्येष्ठ आघोरी साधू आहेत. आणि वर दिलेलं वर्णन हे त्यांचंच आहे. आघोरींना आदराने सन्मानित केलं जातं. ते त्यांच्या कठोर आणि सर्वोच्च तपसाधना आणि अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. कुंभमध्ये बरेच साधू व्यक्तिगत मोक्षावर भर देताना दिसतात. तर अघोरी मात्र सामूहिक भाग्याची गोष्ट करतात.

यावेळचे संकेत वेगळेच

बाबा कालपुरुष हे आपल्या समोरील मैदानाकडे बोट करून म्हणतात, मी गेल्या सात महाकुंभात आलो आहे. प्रत्येकवेळी मी या मैदानात फिरलो आहे. पण यावेळचे संकेत वेगळे आहेत. अग्निसंस्काराच्या ठिकाणी कावळे वेगळेच गीत गात आहेत. मृतक अधिक बैचेन आहेत.

अमावस्येच्या रात्री…

अमावस्येच्या रात्री करण्यात आलेल्या त्यांच्या भविष्यवाणी येणाऱ्या काळातील किचकट चित्र दाखवतात. त्यांची भविष्यवाणी अचूक असते. स्पष्ट असते. कोणतेही संकेत नसतात. थेट भाष्य असतं. अघोरी कालपुरुष बाबा म्हणतात, पृथ्वी श्वास बदलत आहे. त्याचवेळी ते आपल्याजवळी राखेतून पवित्र प्रतिक बनवतात आणि म्हणतात, जेव्हा नद्या आपला मार्ग बदलेल, तेव्हा उधार घेतलेल्या जमिनीवर आपण वास्तव्य करत होतो हे शहरांच्या लक्षात येईल. मनुष्य ज्याला स्थायी किंवा चिरंतन म्हणतो त्याला येणारे चार वर्ष आकार देईल.

कावळ्यांवरून भविष्यवाणी

डॉ. राजेंद्र प्रसाद हे एक सांस्कृतिक मनोवैज्ञानिक आहेत. त्यांनी दोन दशके अघोरी परंपरांचा अभ्यास केला आहे. अघोरींची भविष्यवाणी पर्यावरणाचं निरीक्षण आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टीचं मिश्रण आहे. 1943मध्ये एका अघोरी बाबाने स्मशानभूमीतील कावळ्यांच्या वागण्यावरून बंगालमध्ये दुष्काळ होण्याची भविष्यवाणी वर्तवली होती. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली होती, असं डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं म्हणणं आहे.

आकाश वाचतील

बाबा कालपुरुष यांच्या अनेक भविष्यवाणी पाण्यावर केंद्रीत आहेत. पाण्याची कमी आणि प्रकोपावर आधारीत आहे. डोंगर आपला बर्फ सोडून देतील. आधी हळूहळू, नंतर एकत्रपणे पवित्र नद्या नवे मार्ग शोधतील. अनेक मंदिर पृथ्वीवर परत येतील, अशी भविष्यवाणी बाबा कालपुरुष यांनी वर्तवली आहे. पण बाबा कालपुरुष यांच्या सर्व भविष्यवाणीत विनाश नसतो. बाबा अस्खलित इंग्रजीतून भविष्यवाणी वर्तवतात. मधली पिढी काय विसरली हे तरुण पिढी लक्षात ठेवेल. ही तरुण पिढी पुन्हा आकाश वाचायला शिकेल, असंही ते म्हणतात.

कुंभची जागा बदलेल

बाबा कालपुरुष यांची सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी महाकुंभशी संबंधित आहे. हा समागम बदलेल. नदी वाहत आहे. काळानुसार संगमला नवीन जागा मिळेल. ज्या ठिकाणी वाळवंट आहे, तिथेच येणारी पिढी कुंभचं आयोजन करेल, असं बाबा कालपुरुष म्हणतात.

बुद्धी मरत नाही, फक्त हात बदलतात

पुढचा बदल जगात होणार नाही. तर मनुष्य पुन्हा कसा बघायला शिकतो त्यात होईल. जुन्या शक्ती परत येत आहेत. आपण काय विसरलो हे आता जन्मलेली मुले स्मरणात ठेवतील. ते हवेला समजून घेतील. पृथ्वी कधी हलणार आहे हे त्यांना कळेल. जुनी बुद्धी मरत नाहीये, फक्त हात बदलत आहेत, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर.
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्....