AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : …अन् एका भीक मागणाऱ्याचं आयुष्यच बदलून जातं! पाहा ‘हा’ Inspirational video

Inspirational video : एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झालाय. रस्त्याच्या कडेला आपण बऱ्याचवेळा भिक मागून जगणारे लोक पाहतो. अशांचा एखाद्या योग्य व्यक्तीशी संवाद घडला तर तीही व्यक्ती पुढे यश (Success) संपादन करते. एका भिकाऱ्याचं (Beggar) जीवन कसं बदललं, ते यात दाखवलंय.

Viral : ...अन् एका भीक मागणाऱ्याचं आयुष्यच बदलून जातं! पाहा 'हा' Inspirational video
फुलं विकून भिकाऱ्याचं जीवन बदललं, असा प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरलImage Credit source: Youtube/Gulshan Kalra
| Updated on: Feb 27, 2022 | 7:30 AM
Share

Inspirational video : सध्याचं जग हे स्पर्धेचं आहे, असं म्हटलं जातं. प्रत्येकजण पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासंबंधीचे तसेच प्रेरणादायी व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला असे अनेक लोक भेटतात ज्यांना काहीही करायची इच्छा नसते. तर काही जण असे दिसतात, ज्यांना काहीतरी वेगळं करायची इच्छा असते पण मार्गदर्शन करणारं कोणीही नसतं. जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर तेही यशस्वी होतात. याच विषयाशी संबंधित एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral) झालाय. रस्त्याच्या कडेला आपण बऱ्याचवेळा भिक मागून जगणारे लोक पाहतो. त्यांच्यामध्ये एखादा असा मेहनती व्यक्ती सापडू शकतो, ज्याला काहीतरी करायची इच्छा असते. अशांचा एखाद्या योग्य व्यक्तीशी संवाद घडला तर तीही व्यक्ती पुढे यश (Success) संपादन करते. एका भिकाऱ्याचं (Beggar) जीवन कसं बदललं, त्यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भिकाऱ्याची कथा

व्हिडिओमध्ये एक तरूण व्यक्ती रस्त्याच्या कडेला भीक मागत असते. मात्र त्याला कोणी भीक देत नाही. मग त्याची नजर एका श्रीमंत व्यक्तीवर पडते. तो त्या व्यक्तीला भीक मागतो, पण ती व्यक्ती व्यावसायिक असते. तो तरूण त्या भिकाऱ्याला म्हणतो, मी तुला भीक दिली तर त्यात मला काय मिळणार? मी तर देवाणघेवाणीवर विश्वास ठेवणारा आहे. त्यावेळी भिकारी तरुणाला जाणिव होते आणि तो काहीतरी करायचं ठरवतो. त्याप्रमाणं तो फुलं विकायला लागतो. त्याच्यासमोर तोच व्यावसायिक येतो, त्याला तो फूल विकतो. मग व्यापारीही खूश होतो. अशाप्रकारे रोज फुलं विकून भिकाऱ्याचं जणू जीवनच बदलून जातं. एक संदेश या व्हिडिओतून देण्यात आलाय.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ गुलशन कालरा (Gulshan Kalra) या चॅनेलवर अपलोड करण्यात आलाय. 25 फेब्रुवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला 5.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यात वाढच होत आहे. ‘Aapki ek chhoti si madad kisi ki zindagi badal sakti hai‘ असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलीय. या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश देण्यात आल्यामुळे त्याला लाइक्सही चांगले मिळत आहेत. (Video courtesy – Gulshan Kalra)

आणखी वाचा :

भांडणही हवं तर असं..! Viral होतोय ‘हा’ Frog Dog funny video; यूझर्स म्हणतायत, असा आत्मविश्वास हवा!

वाहनाची काच फोडून मगर आली रस्त्यावर, कर्मचाऱ्यांची पळापळ; पाहा Viral video

Shocking video viral : केवळ अमानवी..! रशियन रणगाडा युक्रेनियन कारवर घुसला आणि…

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.