तुम्हीही म्हणाल, “घरात असा स्टंट करायची गरजच काय?”
खऱ्या अर्थाने पाहिलं तर हल्ली तरुणांमध्ये स्टंटची क्रेझ खूप पाहायला मिळत आहे. स्टंट करून सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण स्टंट करणं हा काही पोरखेळ नाही, त्यासाठी भरपूर सराव करावा लागतो. पण काही लोक असे असतात जे कुठेही काहीही करून स्टंट करायला सुरुवात करतात.

मुंबई: सोशल मीडियाच्या दुनियेत जर एखादी गोष्ट सर्वात जास्त फेमस असेल तर ती म्हणजे स्टंट व्हिडिओ. इंटरनेटवर जे काही येतं त्यात सगळ्यात अग्रेसर असतात स्टंटचे व्हिडीओ. स्टंट हे सर्वाधिक लोकांचे लक्ष वेधून घेणारे व्हिडिओ आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सगळ्यांना आवडत आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं तर हल्ली तरुणांमध्ये स्टंटची क्रेझ खूप पाहायला मिळत आहे. स्टंट करून सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण स्टंट करणं हा काही पोरखेळ नाही, त्यासाठी भरपूर सराव करावा लागतो. पण काही लोक असे असतात जे कुठेही काहीही करून स्टंट करायला सुरुवात करतात. आता पाहा हा व्हिडिओ यात हा मुलगा आपल्या खोलीत बाईकवर स्टंट करताना दिसतोय.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या बाईकचे पुढचे चाक उचलून रूममध्ये स्टंट करण्यास सुरुवात करते, पुढे जाताच बाइकचे पुढचे चाक टीव्हीला धडकते आणि तो टीव्ही खाली पडतो आणि फुटतो. आता हा स्टंट दाखवून प्रसिद्ध व्हायचं असलं तरी हा स्टंट आपल्याला एवढा महागात पडणार आहे हे त्याला माहित नव्हतं.
View this post on Instagram
diogo_grau062 नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओला दोन लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले असून लाखो लोकांनी पाहिले आहे. याचबरोबर लोक त्यावर कमेंट करत आहेत आणि म्हणत आहेत की, “असा स्टंट घरी करण्याची गरजच काय होती?”
