Video| वय अवघं 14 वर्षे, रस्त्यावर कचोरी विकतानाचा व्हिडीओ व्हायरल, लोकांची मदतीसाठी एकच गर्दी

व्हायरल होत असलेला व्हिडीओ गुजरात राज्यातील अहमदाबादमधील मणिनगर रेल्वे स्थानकाजवळचा आहे. या मुलाचे वय फक्त 14 वर्षे आहे. तो एका स्कुटीवर कचोरी तसेच समोसे विकत आहे. आपल्या आई-वडिलांना मदत म्हणून तो हे काम मागील अनेक दिवसांपासून करतोय.

Video|  वय अवघं 14 वर्षे, रस्त्यावर कचोरी विकतानाचा व्हिडीओ व्हायरल, लोकांची मदतीसाठी एकच गर्दी
dahi kachori boy viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. या माध्यमावर अशा काही गोष्टी असतात, ज्या तुम्हाला अनंद देऊन जातात. तर काही घटनांना पाहून तुम्हाला दु:ख होते. सोशल मीडियाच्या जोरावर एका रात्रीमध्ये स्टार झालेल्यांची संख्यादेखील कमी नाही. यामध्ये रानू मंडल, बाबा का ढाबा, बाबा जॅक्सन अशी बरीच नावं घेता येतील. सध्या मात्र या नावांमध्ये गुजरातच्या आणखी एका मुलाचे नाव जोडावे लागेल. कारण हा मुलगा एका व्हिडीओमुळे संपूर्ण भारतात चर्चेचा विषय ठरला आहे. (boy selling dahi kachori in ahmedabad gujarat video went viral on social media)

वय 14 वर्षे, विकतोय दही कचोरी

व्हायरल होत असलेला व्हिडीओ गुजरात राज्यातील अहमदाबादमधील मणिनगर रेल्वे स्थानकाजवळचा आहे. या मुलाचे वय फक्त 14 वर्षे आहे. तो एका स्कुटीवर कचोरी तसेच समोसे विकत आहे. आपल्या आई-वडिलांना मदत म्हणून तो हे काम मागील अनेक दिवसांपासून करतोय. याच मुलाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याला मदत करण्याची विनंती सोशल मीडियावर केली जात आहे.

लोकांनी मदतीसाठी अक्षरश: गर्दी केली

विशेष म्हणजे या छोट्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला असून लोक त्याच्या मदतीसाठी धावून गेले आहेत. लोक त्याच्या ठेल्यावर जाऊन दही कचोरी घेण्यासाठी गर्दी करत आहेत. त्याने तयार केलेली दही कचोरी खाण्यासाठी अक्षरश: लोकांची झुंबड उडाली आहे. नेटकरी या मुलाला जमेल त्या पद्धतीने मदत करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा

या छोट्या मुलाचा व्हिडीओ सर्वात अगोदर @vishal_dop या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता. बघता बघता या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात रिट्विट करण्यात आले. सध्या या मुलाला मदत करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात आले असून त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

गोंडस कुत्र्याची दाढी आहे जमिनीपर्यंत लांब, मालकीणबाई दररोज तासभर विंचरतात Teddy Dog चे केस

महिलेच्या सूचनांचं खारुताईकडून जसच्या तसं पालन, फटाफट संपवले बदाम, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

Video | तरुणांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमधून चालवली स्कुटी, अन् बघता बघता चटणी तयार, मजेदार व्हिडीओची चर्चा

(boy selling dahi kachori in ahmedabad gujarat video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI