Video | भर रस्त्यावर नवरी-नवरदेवाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 03, 2021 | 10:08 PM

नवरदेव डान्स करत असल्याचे पाहून नवरीसुद्धा त्याच्याजवळ आली आहे. नवरदेवाला पाहून तिला डान्स करण्याचा मोह आवरता आला नसावा. काही वेळानंतर नवरीने अचानकपणे ठेका धरला आहे.

Video | भर रस्त्यावर नवरी-नवरदेवाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
bride and groom
Follow us

मुंबई : आपल्या लग्नाचा क्षण कायम स्मरणात राहावा म्हणून कपल्स वेगवेगळ्या गोष्टी करतात. एखादी नवी जोडी आकर्षक सजावट करुन त्यांच्या लग्नाचा क्षण अविस्मरणीय बनवतात. तर काही ठिकाणी नवरदेव किंवा नवरी वेगळीच करमत करुन सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतात. सध्या अशाच एका करामती जोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खूश झाले आहेत. व्हिडीओतील नवरी आणि नवरदेवाने केलेला डान्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. (bride and groom dancing funny video went viral and is on trending)

नवरी आणि नवरदेवाने मजेदार डान्स केला

व्हायरल होत असलेल्या डान्समध्ये नवरी आणि नवरदेवाने अगदीच मजेदार डान्स केला आहे. त्यांनी केलेला हा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. सुरुवातीला नवरदेव एका मजेदार संगीतावर थिरकत असल्याचे दिसत आहे. त्याचा डान्स पाहून बाजूच्या लोकांनी टाळ्या वाजवू त्याला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवातीला फक्त नवरदेवच डान्स करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. मात्र, काही वेळानंतर नवरीने समोर येऊन सगळे वातावरणच बदलून टाकले आहे.

नवरीचा डान्स पाहून सगळेच चकित 

नवरदेव डान्स करत असल्याचे पाहून नवरीसुद्धा त्याच्याजवळ आली आहे. नवरदेवाला पाहून तिला डान्स करण्याचा मोह आवरता आला नसावा. काही वेळानंतर नवरीने अचानकपणे ठेका धरला आहे. तिने डान्स करायला सुरुवात करताच सगळे चकित झाले आहेत. नवरदेवसुद्धा नवरीकडे बघताच राहिला आहे. नंतर नवरी आणि नवरदेव असे दोघे सोबत डान्स करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांकडू व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर 

हा मजेदार प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ; याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंदीस उतरत आहे. नेटकरी हा व्हिडीओ आवडीने पाहत असून त्याला उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘official_niranjanm87’ या अकाऊंटवर पाहायला मिळेल.

इतर बातम्या :

Video | तरुणाची हँडलकडे पाठ, तरीही चावलतोय शिताफीने बाईक, चक्रावून सोडणारा व्हिडीओ व्हायरल

Video | डान्स फ्लोअरवर मित्रांचा भन्नाट डान्स, पण मध्येच काहीतरी बिनसलं अन् घडला विचित्र प्रकार, व्हिडीओ पहाच !

Video | चार मित्रांची बाईकवर सफर, पण मध्येच साप आला अन् भलतंच घडलं, पाहा व्हिडीओ

(bride and groom dancing funny video went viral and is on trending)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI