Viral : लग्नाआधी पाहा नववधूचा स्वॅग; Video पाहून यूझर्स म्हणतायत, किमान हेल्मेट तरी घालायला हवं होतं..!

Viral : लग्नाआधी पाहा नववधूचा स्वॅग; Video पाहून यूझर्स म्हणतायत, किमान हेल्मेट तरी घालायला हवं होतं..!
बुलेट चालवताना नववधू

एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे ज्यामध्ये एक नववधू तिच्या लग्नाआधी बाइक चालवत आहे. होय! हा व्हिडिओ सर्वांनाच आवडलाय. लोक त्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सद्वारे त्यांच्यावर प्रेम करत आहेत.

प्रदीप गरड

|

Jan 21, 2022 | 10:35 AM

सध्या लग्नसराई(Wedding)चा सीझन सुरू आहे आणि इंटरनेटवर वधू-वरांच्या अत्यंत महत्त्वाच्या दिवसाचे अनेक व्हिडिओ (Video) आहेत. हे व्हिडिओ खूप मजेदार आणि मनोरंजक आहेत. ते दिवस आता गेले जेव्हा वधू तिच्या लग्नाच्या दिवशी लाजून घरात बसत होती. आता जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यात सर्व नववधू जुन्या प्रथा संपवताना दिसत आहेत. त्यांचा हा बदल सर्वांनाच भावला आहे. असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे ज्यामध्ये एक नववधू तिच्या लग्नाआधी बाइक चालवत आहे. होय! हा व्हिडिओ सर्वांनाच आवडलाय. लोक त्यांच्या लाइक्स आणि कमेंट्सद्वारे त्यांच्यावर प्रेम करत आहेत.

प्रेमविवाहासाठी…

व्हिडिओमध्ये एक वधू दिसत आहे, जी लाल रंगाचा लेहेंगा घालून सजलेली आहे. व्हिडिओमध्ये नववधू बुलेट चालवताना दिसत आहे. नववधूचा हा स्वॅग सर्वांनाच खूप आवडला आहे. सोशल मीडिया यूझर्सना हा व्हिडिओ खूप आवडतोय. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिननं कॅप्शनमध्ये लिहिलंय, जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्या प्रेमविवाहासाठी सहमत असेल. टॅग करा अशा मित्रांना जे त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत, फक्त कुटुंबावर विश्वास ठेवा.

‘हेल्मेट तरी वापरायला हवं होतं’

हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांनी वधूच्या स्वॅगला पसंती दिली आहे. मात्र, इतर काहींनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत किमान हेल्मेट तरी वापरायला हवं होतं, असं सांगितलं. एका यूझरनं लिहिलं, की जर परिधान केलेला ड्रेस टायरमध्ये गेअडकला, काय होईल? दुसर्‍या यूझरनं लिहिलंय, ‘बाईक चालवणं ठीक आहे, पण इतके जड कपडे घालणं आणि हेल्मेट न वापरणं धोकादायक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काय करतात?

Pandit Ji Rocks Dulha Shock : लग्नमंडपात वराला नव्हता धीर; मग पुजारी असं काही बोलले, की…

Viral : गवंडीकाम करणारी युवती बनली एका प्रॉडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर, वाचा सविस्तर

लग्नाची चर्चा तर होणारच ना भाऊ; कोरोना निर्बंधांमध्येही 450 लोक राहणार उपस्थित, जोडप्याने बनवला स्पेशल प्लॅन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें