Budh Pradosh: ‘हे’ व्रत करा; जीवनातील अवघड समस्याही चुटकीसरशी सुटतील

| Updated on: Feb 23, 2021 | 3:48 PM

बुध प्रदोष व्रत (Vrat) अत्यंत शुभ मानले जाते. असा विश्वास आहे की, या दिवशी काही विशेष उपाय केल्यास सर्व समस्या दूर होतात. | Budh Pradosh vrat

Budh Pradosh: हे व्रत करा; जीवनातील अवघड समस्याही चुटकीसरशी सुटतील
Follow us on

मुंबई: प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष त्रयोदशीला केले जाते. यावेळी हा उपवास 24 फेब्रुवारी रोजी होत आहे. प्रत्येक दिवसानुसार प्रदोषाला भिन्न नावं आणि महत्त्व आहे. बुधवारी पडणारा प्रदोष ‘बुध प्रदोष व्रत’ म्हणून ओळखले जाते.  बुध प्रदोष व्रत (Vrat) अत्यंत शुभ मानले जाते. असा विश्वास आहे की, या दिवशी काही विशेष उपाय केल्यास सर्व समस्या दूर होतात. तुमच्या आयुष्यातही कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास बुध प्रदोषच्या दिवशी हे उपाय करा. (Budh Pradosh vrat)

आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी काय कराल?

प्रदोष व्रताची विधिवत पूजा आणि उपवासाव्यतिरिक्त घरातील वडील व मुले यांच्या हस्ते गरजू लोकांना मिठाई आणि हिरव्या वस्तू दान करा. गणपतीचं नामस्मरण करा आणि ओम गण गणपतये नमः मंत्राचा जप करा.
याशिवाय महादेवाच्या ‘उन क्लेन क्लीन क्लीन क्लीं वृषभराधुदय वामंगे गौरी कृत्य क्लेन क्लेइन उन नमः शिवाय’ मंत्राचा 108 वेळा जप करा.

घरात समृद्धी नांदावी म्हणून काय कराल?

बुध प्रदोषच्या दिवशी दीड किलो तांदूळ घ्या. यापैकी काही तांदूळ शंकराच्या मंदिरात वाहा. तर उरलेले तांदूळ काही गरजूंना दान करा. संध्याकाळी पूजेनंतर घराच्या काही तांदूळ कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.

वैवाहिक जीवन कसे सुधाराल?

बुध प्रदोष उपवासाच्या आदल्या दिवशी, पूर्व दिशेला तोंड करून ध्यानाला बसा. यावेळी 11 वेळा ऊँ चा जप करा. यानंतर एक पांढरा कोरा कागद घ्या, त्यावर सिंदूरने क्ली लिहा. हा कागद फोल्ड करून आपल्या जोडीदाराच्या कपड्यांच्या कपाटात ठेवा. मात्र, हा कागद दिसणार नाही, अशा जागी ठेवा. हळूहळू आपले नाते सुधारण्यास सुरवात होईल.

चांगल्या आरोग्यासाठी काय कराल?

बुधवारी चार वाती असलेल्या निरांजनात गायीचे तूप घालून ते प्रज्वलित करावे. हे निरांजन शंकराच्या पिंडीजवळ ठेवावे. यानंतर दिवसातून तीनवेळा शीव चालिसा वाचावी आणि देवाकडे कुटुंबीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी.

संबंधित बातम्या:

59 वर्षांनंतर ‘या’ सहा ग्रहांची युती; जाणून घ्या तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?

Valentines दिवशीच शुक्र मावळणार तर गुरूचा होणार उदय, तुमच्या आयुष्यावर होईल मोठा परिणाम

(Budh Pradosh vrat)